दारुबंदी कायद्याअन्वये सेलू पोलीसांची कारवाई.
- दिनांक 23/10/2023 रोजी रात्री 19.40 वा. दरम्यान मौजा आर्वी लहान शेत शिवारातील नाल्याचे काठावर एक ईसम हातभट्टी लावून गावठी मोहा दारु गाळीत आहे अशी मुखबीरकडून खात्रीशीर माहिती मिळाल्यावरुन पंच व पोस्टापसह मुखबीर यांचे माहीतीप्रमाणे मौक्यावर जावून छापा टाकला असता मौक्यावर आरोपी नामे रवींद्र शामराव कळमकर वय 50 वर्ष रा सुकळी स्टे. हा हातभट्टी लावून गावठी मोहा दारु गाळीत असतांना मिळून आल्याने सदर आरोपीचे ताब्यातून मौक्यावर 4 लोखंडी ड्रम मध्ये उकळता मोहा रसायन सडवा 200 लीटर, 08 प्लास्टिक ड्रम मध्ये 800 लीटर कच्चा मोहा रसायन सडवा, 6 प्लास्टिक डबकीत 150 लीटर गावठी मोहा दारु व हातभट्टी साठी लागणारे ईतर साहीत्य असा एकूण जु.कि. 1,44,000/- रु. चा माल मिळून आल्याने मौक्यावर नाश करण्यात आला असून आरोपी नामे रवींद्र शामराव कळमकर वय 50 वर्ष रा सुकळी स्टे. हा सुकळी स्टे. येथे राहणारा प्रवीण थूल याचे संगनमताने हातभट्टी लाऊन गावठी मोहा दारू गळीत असल्याचे सांगितल्याने क्र.1) रवींद्र शामराव कळमकर वय 50 वर्ष क्र. 2 प्रवीण थूल दोन्ही रा सुकळी स्टे. ता. सेलू जि. वर्धा यांचे विरुध्द पोलीस स्टेशन सेलू येथे कलम 65 बी,सि.एफ., 83 मदाका अन्वये कार्यवाही करण्यात आली.सदरची कारवाई मा. पोलीस अधीक्षक श्री. नुरुल हसन, मा. अपर पोलीस अधीक्षक श्री. सागर कवडे, मा, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. प्रमोद मकेश्वर यांचे मार्गदर्शनात ठाणेदार सपोनि. तिरुपती राणे पो.स्टे सेलू पोलीस अंमलदार गणेश राऊत, ज्ञानदेव वनवे यांनी केली.
अविनाश नागदेवे सहासिक न्यूज-24