हिंगणघाट /आम आदमी पक्ष व विदर्भ विकास आघाडी यांच्या संयुक्त विद्यमाने दिल्ली सीमा क्षेत्रावर अविरत सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला जाहीर समर्थनाची घोषणा करून आंदोलनातील सर्व मागण्यांची पूर्तता केंद्र सरकारने लवकरात लवकर करावी तसेच आंदोलनात शहीद झालेल्या शेतकरी कुटुंबांना प्रत्येकी एक कोटी रुपये मदत राशी देण्यात यावी. अशी मागणी विदर्भ विकास आघाडी व आम आदमी पक्षाच्या वतीने करण्यात आलेली आहे. सोबतच प्रधानमंत्री पिक विमा अंतर्गत वर्धा जिल्ह्यातील दोन लाख 27 हजार शेतकऱ्यांनी नोंद केली. नुकसानीची माहिती पाठवली परंतु खरीप व रब्बीचे कोणतेही चुकारे अद्याप बहुसंख्य शेतकऱ्यांना मिळाले नाही.ते तात्काळ देण्यात यावे. सोयाबीन पिकाचे मोठ्या प्रमाणात बुरशीजन्य मोजेक रोगाने नुकसान झाले आहे.त्याची नुकसान भरपाई अजून मिळाली नाही. ती तात्काळ देण्यात यावी. पीक विम्याचे अंतर्गत वर्धा जिल्ह्यातून वर्ष 2023-24 ला केंद्र सरकार व राज्य सरकारच्या मार्फत दहा टक्के प्रीमियम जवळपास 375 कोटी रुपये विमा कंपनीला चुकते केले आतापर्यंत शेतकऱ्यांना जवळपास 375 कोटी रुपये विमा कंपनीला चुकते केले. आतापर्यंत शेतकऱ्यांना जवळपास 36 ते 38 कोटी रुपये विमा प्राप्त होण्याची शक्यता आहे. म्हणजे जवळपास330 ते 335 कोटी रुपयांचा फायदा विमा कंपनीला शेतकऱ्यांच्या नावावर होत आहे असे दिसून येते. म्हणून शेतकरी आंदोलनाची मागणी आहे की केंद्र आणि राज्य सरकारची विमा कंपनीला जाणारी प्रीमियमची रक्कम दरवर्षी शेतकरी सामुग्रह राशी फंडाच्या नावावर जिल्ह्यांना देण्यात यावी. आणि जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत समिती गठन करून ती राशी जिल्ह्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना वाटण्यात यावी याबाबत योग्य निर्णय घेण्यात यावा. तसेच शेती उत्पादनाला हमीभाव ( c+2) या सूत्रानुसार देण्यात यावा.शेतीला दररोज दिवसा किमान 12 तास वीज पुरवठा मिळाला पाहिजे. जिल्ह्यामध्ये जवळपास अडीच लाख हेक्टर शेती ओलीता खाली येईल एवढे पाणी प्रकल्पामध्ये आहे परंतु सुविधा नसल्याने केवळ दहा टक्के ओलित होत असते. त्यामुळे जिल्ह्यातील प्रत्येक शेतकऱ्याला पाण्याची सोय करून देण्यासाठी शासनाने योग्य नियोजन सुविधा व फंड उपलब्ध करून ओलिताचे क्षेत्र वाढवायला सहकार्य करावे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांना जंगली जनावरांच्या मार्फत होणारे पिकाचे नुकसान व मनुष्य जीविताला होणारा धोका यासंबंधी वन विभागाने नियमानुसार पिकाच्या नुकसानीचे पैसे तात्काळ शेतकऱ्यांना द्यावे. अशा अनेक मागण्या विदर्भ विकास आघाडीचे अध्यक्ष तथा आम आदमी पक्षाचे अनिल जवादे यांनी केले यावेळी महेश माकडे , दिनेश वाघ व कार्यकर्ते सोबत होते.