देवळीतील ‘फ्रेंच पॉलिश’ पासून दारू बनविणारा सुधिर येळणे वर पोलिसांचा मोठा आशीर्वाद

0

साहसिक न्युज24
प्रमोद पाणबुडे/ वर्धा:
वर्धा जिल्हा हा गांधी जिल्हा म्हनुण ओळखला जातो, परंतु या वर्धा जिल्हा मध्ये मोठ्या प्रमाणात ‘फ्रेंच पॉलिश’ पासून देशी विदेशी दारू तयार करून विकल्या जात आहे. याकडे जिल्हा पोलिस अधीक्षक लक्ष का देत नाही आहे…हे मात्र एक कोडच आहे… लहान लहान युवकांना सुद्धा दारूचे व्यसन लागले आहे . त्यामुळे नागरिकांना खुप त्रास होत आहे…
देवळी येथील सुधीर येळणे हा आपल्याच घरी एका रूममध्ये फ्रेंच पॉलिश आणून विदेशी दारूच्या शिष्यामध्ये मिसळून एक शिशीच्या चार शिष्या बनवून विकतो . यामुळे दारू पिणाऱ्याचे आरोग्य मोठ्या प्रमाणात धोक्यात आले आहे… पोलिसांनी सुधीर येळणे वर कारवाई केली मात्र, ती नावापुरतीच ‘तू रडल्यासारखं कर आम्ही मारल्यासारखं करतो’ अशा पद्धतीने ही कारवाई केली गेली आहे… या संदर्भात सुधीर येळणेशी आमच्या प्रतिनिधीने फोन द्वारे माहिती घेण्याचा प्रयत्न केला असता , सुधीर येळणे यांनी सांगितले की मी पोलिसांना महिन्याकाठी लाखो रुपये देत असतो याची माहिती लागल्यास तुम्ही माझ्याकडे या माझ्याकडे एका डायरीमध्ये मी कोणत्या पोलिसांना किती रुपये देतो याची नोंद आहे . यावरून असे लक्षात येते की पोलीस सांगतात की तुम्ही दारू विका आणि नागरिकांच्या जीवाशी खेळा… सुधीरचे एकूण चार रूमचे घर आहेत . त्यामध्ये तो एका रूम मध्ये फ्रेंच पॉलिश पासून देशी विदेशी दारू तयार करतो, व ही दारू स्लॅब वरती ठेवतो… ग्राहकांना जेवढी दारू पाहिजेच तेवढी दारू तो स्लॅप वरून काढून देतो. एका दिवसाला बनावट दारूच्या तब्बल तीन ते चार पेट्या विकल्या जातात… जे दारू पितात ते दुसऱ्या दिवशी रुग्णालयात दाखल होतात या संदर्भात देवळी येथील डॉक्टरांशी आम्ही संपर्क केला असता त्यांनी सांगितले की, मोठ्या प्रमाणात दारूमध्ये भेसळ होत असल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आहे… देवळी मध्ये काही दिवसापूर्वीच याच फ्रेंच पॉलिशची दारू पिल्याने एका 55 वर्षाच्या इसमाचा मृत्यू झाला आहे. परंतु पोलीस अजून पर्यंत या बनावट दारू अड्ड्यावर धाड टाकून तो अड्डा बंद करू शकले नाही, नेमकं कारण काय ?

वाचा पुढील भागात..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!