देवळीतील ‘सुधीर’ चालवतो फ्रेंच स्पॉलिश पासून तयार केलेल्या बनावट देशी विदेशी दारूचा अड्डा
साहसिक न्युज24
प्रमोद पाणबुडे / वर्धा:
महापुरुषाची कर्मभूमी असलेल्या वर्धा जिल्ह्यात 1974 मध्ये दारूबंदीचा निर्णय घेण्यात आला. मात्र , तब्बल 48 वर्ष उलटूनही ही दारूबंदी कागदावरच राहिल्याचे दिसून येत आहे. देवळी शहरात सुद्धा मोठ्या प्रमाणात अवैद्य देशी विदेशी दारूची ची सर्रास विक्री सुरु असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. अशातच देवळी येथील यवतमाळ हायवे रोडवर चालत असलेली देशी विदेशी दारूची विक्री सुधीर येळने नामक व्यक्तीने खुलेआम सुरु केली आहे. या दुकानाला तर शासनाकडून परवानाच दिला असल्याचे चित्र तिथे दिसतात. देवळी तालुक्यातील नागरिक एस टी बस उतरले की सरळ ‘सुधीर’ च्या अवैध दारुच्या गुत्यावर दारू पिण्यास जातात व दुसऱ्या दिवशी रुग्णालयात उपचारासाठी भर्ती होतात. नागरिकांच्या जिवाशी खेळणाऱ्या या विषारी दारू विक्रेत्यांवर कारवाई कधी होणार? असा प्रश्न परिसरातील महिलांना पडला आहे.
पुढील भागात वाचा, दारू विक्रेता सुधिर येळणे ने सांगितले साहसिक न्युज24 ला कोणत्या पोलिसांना किती रुपये महिना देतो यांची डायरी मधील नावे…