देवळीत बैलपोळा उत्साहात साजरा, हजारो शेतकऱ्यांचा बैलासह पोळा उत्साहात सहभाग.
शेकडो वर्षापासून मीरननाथ महाराज पटांगनावर भरतो पोळा उत्सव
सागर झोरे
सहासिक न्यूज 24/देवळी
श्रावण मास संपल्यावर हिंदू धर्मात पोळा हा बैलाचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो या सणाला एक दिवसाआधी बैलांच्या खान शेकनी पासून सुरुवात होते त्यानंतर दुसऱ्या दिवशी बैलाला मोठ्या थाटात सजवून वेगवेगळ्या प्रकारचे शिंगार करून बैलांच्या अंगावर अंगरखा टाकून बैलांच्या शिंगावर मोरपिसांचे तुर्रे लावून यांना थाटात सजवून शेतकरी त्यांना ढोल ताशाच्या गजरात वाजत गाजत बैलांना पोळ्या भरण्याच्या ठिकाणी घेऊन जातात.
देवळी शहरात या वर्षी सुद्धा मोठ्या उत्सहात मीरंनाथ महाराजाच्या पटांगनावर शेकडो वर्षापासून भरत आलेला पोळा यावर्षी सुद्धा भरला या बैलपोळ्यामध्ये हजारो शेतकऱ्यांनी आपल्या बैलांसह सहभागी झाले यावेळी तिथे झालेल्या कार्यक्रमात मंचावर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी नगराध्यक्षा शोभा तडस तर प्रमुख पाहुणे म्हणून माझी उपाध्यक्ष नरेंद्र मदनकर,ठाणेदार भानुदास पिदुरकर,शरदराव आदमने,माजी नगरसेवक अशोकराव करोटकर,हे प्रामुख्याने उपस्थित होते यावेळी पोळा पंच कमिटीने बैलपोळ्यात आलेल्या आकर्षक पाच बैल जोड्या निवडल्या त्यामध्ये प्रथम पारितोषिक शेतकरी रुपेशराव उगेमुगे यांच्या बैल जोडीला मिळाला,द्वितीय पुरस्कार शेतकरी अशोकराव मरघाडे यांच्या बैल जोडीला मिळाला,तृतीय पुरस्कार शेतकरी सागर रघाटाटे यांच्या बैल जोडीला मिळाला,चतुर्थ पुरस्कार शेतकरी गजाननराव शेंडे यांच्या बैल जोडीला मिळाला तर पाचवे पुरस्कार शेतकरी अशोकराव सुरकार यांच्या बैल जोडीला मिळाला यानंतर आलेल्या शेकडो बैल जोड्यांना शेला देऊन सत्कार करण्यात आला. त्यानंतर आभार प्रदर्शन करून बैलपोळ्याची संगता करण्यात आली.
सायंकाळी सर्व बैल जोड्या आपापल्या घरी येऊन बैलांचे पूजन करून हा बैल पोळा सण उत्साहात साजरा केला.