देवळी तालुक्यातील रत्नापूर येथे तरुण शेतकऱ्याची आत्महत्या.
मृतक दिनेश मडावी
देवळी :तालुक्यातील रत्नापूर येथे तरुण शेतकरी दिनेश नानाजी मडावी वय ३८ वर्ष याने आपल्या स्वतःच्या शेतामध्ये कीटकनाशक सेवन करून आत्महत्या केल्याची खळबळ जनक घटना मंगळवारी दुपारी घडल्यामुळे रत्नापूर गावामध्ये घडलेल्या घटना मुळे गावात हळहळ व्यक्त होत आहे दिनेश मडावी याचा लहान भाऊ हा दुपारच्या वेळी शेतात गेल्यानंतर दिनेश हा बेशुद्ध अवस्थेत पडून दिसला आणि त्वरित त्याने आरोड ओरड केल्यामुळे आजू बाजूचे शेतकरी जमा झाले आणि त्वरित भिडी येथे शासकीय रुग्णालयात उपचार करण्याकरिता दाखल करण्यात आले.डॉक्टरांनी त्याची प्रकृती चेक करून त्याला मृत्यू घोषित केले.तसेच दिनेश कडे वडिलोपार्जित चार एकर शेती आहे.शेतीमध्ये कापूस पिकाची लागवड केली होती. पावसामुळे शेतीतील पीक उत्पन्न होण्यापासून वंचित राहणार या चिंतेने दिनेश हा नेहमी तणावात राहत होता त्याच्यावर खाजगी व बँकेचे कर्ज असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळेच त्यांनी आत्महत्या केली असावी अशी गावात चर्चा आहे . त्याच्या परिवारामध्ये पत्नी,लहान मुलगी,दोन भाऊ हे सर्व रोज मजुरी करणारा कुटुंब होता दिनेश हा एकमेव करता पुरुष असल्यामुळे त्याच्यावर परिवाराची संपूर्ण जबाबदारी होती त्याच्या आत्महत्येने त्याच्या परिवार उघड्यावर आल्याचे सांगण्यात येत आहे.दिनेश मडावी याला शासकीय मदत मिळावी अशी मागणी रत्नापूरचे सरपंच सुधीर बोबडे उपसरपंच सौरव कडू तसेच गावातील इतर नागरिकांनी शासनाला विनंती केली आहे.
सागर झोरे सहासिक न्यूज-24