देवळी परिसरात शेतीपंपाच्या चोरीमध्ये वाढ,मोटार पंप चोरीतील चोरटे देवळी पोलिसांच्या गळाला.
मोटार पंप चोरीतील चोरटे देवळी पोलिसांच्या गळाला.
देवळी:परिसरातील शेतीमध्ये ओलिता करिता शेतकऱ्याने विहिरीवर मोटार पंप बसवलेले आहे.याचा फायदा घेत चोरट्याने चोरी करण्याचे प्रमाणामध्ये वाढ दिसत आहे.सदर सतीश प्रभाकर घोडे यांच्या मालकीची मोटर पंप रुपेश सोनकुसरे राहणार माडा कॉलनी देवळी यांच्या घरी ठेवून होती परंतु ४ ऑक्टोंबर रोजी चोरट्यांनी घरी कोणी नसल्याचा फायदा घेत बघून रात्री मोटार पंप चोरून नेली त्यामुळे या शेतकऱ्याचे आर्थिक नुकसान झाले आहे.सदर शेतकऱ्याने देवळी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केल्यावर गुन्हे अवशेष विभागाने तपास करून चोरटे शोधून काढले व त्यांच्याकडून मोटार पंप जप्त केली यामध्ये आरोपी म्हणून शंकर नांदणे उर्फ मास वय ३७ वर्ष राहणार इंदिरानगर देवळी व रितिक उर्फ नरेंद्र रामराव अडेकार वय ४० वर्ष राहणार इंदिरानगर देवळी यांना अटक करण्यात आली ही कारवाई ठाणेदार भानुदास पिदुरकर यांच्या मार्गदर्शनाखाली केली असून नितीन तोडासे,विनोद कांबळे,गणेश इंगळे यांनी केली असून पुढील तपास नितीन तोडासे हे करीत आहे.
सागर झोरे सहासिक न्यूज-24 देवळी