देवळी येथे पॅसेंजर रेल्वे गाडीचे प्रथम आगमन,२८ फेब्रुवारी पासून रेल्वे सुरू देवळीत ऐतिहासिक नोंद…..

0

 

🔥२८ फेब्रुवारी पासून रेल्वे सुरू देवळीत ऐतिहासिक नोंद.

खा.रामदास तडस यांचे देवळी रेल्वे स्टेशनवर झाले भव्य स्वागत.

 देवळी शहरातील अभियंता अशोक राऊत यांनी काढली पॅसेंजर रेल्वेची प्रथम टीकीट.

देवळी / कळंब वर्धा प्रथमच सुरू झालेली प्रवासी गाडी आज २८ फेब्रुवारी ला संध्याकाळी देवळी रेल्वे स्थानकावर आगमन होताच देवळी रेल्वे स्थानकावर उपस्थित नागरिकांनी व प्रवाशांनी या रेल्वे गाडीचे मोठया उत्साहित स्वागत केले.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या गाडीला हिरवी झेंडी दाखवून कळंब येथून ही प्रवासी गाडी वर्धा कडे रवाना झाली या गाडीचे देवळी येथे आगमन होताच खासदार रामदास तडस यांनी या गाडीत प्रवास केला व ही रेल्वे गाडी देवळी रेल्वे स्थानकावर थांबतात खासदार तडस यांची उपस्थित देवळी शहरवासी यांनी पुष्पगुच्छ देऊन भव्य स्वागत केले.तसेच इंजन ड्रायव्हर गजानन रोडे आणि गार्ड यांना पुष्पगुच्छ देऊन यांचे ही स्वागत करण्यात आले.टीकीट विक्रीची सुरुवात अभियंता अशोक राऊत यांनी प्रथम टीकीट घेतल्यावर टीकीट विक्रीची सुरुवात केली.ही रेल्वेगाडी आठवड्यातून पाच दिवस धावणार असून बुधवार आणि रविवार दोन दिवस बंद राहणार आहेत. या सुरू झालेल्या रेल्वे गाडीला प्रवाशाचा कसा काय प्रतिसाद मिळतो गाडीच्या फेऱ्या सुरू झाल्यावरच प्रवाशाची चढ उतारीवर या गाडीला मिळणारे आर्थिक उत्पन्न ठरणार आहे.

रेल्वेच्या प्रथम आगमना प्रसंगी रेल्वेचे कर्मचारी प्रवीण गांधी, व्ही आर भाले,अमित आर वरके, जी एस भुरे, व पोलीस कर्मचारी यांची यावेळी प्रामुख्याने उपस्थिती होती.तसेच यावेळी देवळीतील माजी नगराध्यक्ष शोभा तडस,विद्या झीलपे,मंगला सुरकार,विश्वजीला पोटदुखे, रेखा सातपुते,दीपाली पाहुणे, रेखा चंदनखेडे,ज्योती खाडे,वैशाली समर्थ,माजी न प उपाध्यक्ष नरेंद्र मदनकर,मारोतराव मरघाडे,उमेश कांमडी,ज्ञानेश्वर साहरे,रवी पोटदुखे,डॉ साखरकर,ज्ञानेश्वर दुर्गुडे,नरेश ढोकणे, तसेच मोठ्या संख्येत देवळी शहरातील महिला व पुरुष उपस्थित होते.

सागर झोरे साहसिक न्यूज /24 देवळी 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!