🔥देशात वर्धा जिल्हा हॉट असल्याने संत्रा मोसंबी उत्पादक शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान,संत्रा मोसंबी बाग जगेल की मरेल?
साहर,प्रतिनिधी शरद वरकड
वर्धा जिल्ह्यातील आष्टी तालुक्यात मोठ्या प्रमाणात संत्रा मोसंबी उत्पादक शेतकरी असून वर्धा जिल्ह्याचे तापमान देशांमध्ये पहिल्या नंबर वर हॉट असल्याने या तापमानाचा बागांवर मोठा परिणाम होत असून लहान असलेल्या फळांची मोठ्या प्रमाणात गळ होत आहे तर ज्या फळांची साईज थोडी मोठी झालेली आहेत ती फळे भाजत असून झाडे जगतील की मरतील याबाबत शेतकऱ्यांमध्ये चर्चा सुरू आहेत जेव्हा शेतकऱ्यांनी आंबिया बाराचे नियोजन केले होते त्यावेळी सुद्धा मोठ्या प्रमाणात तापमानात वाढ झाली होती अशा परिस्थितीत 50 टक्के बहार व फळे ही गळलेली होती त्यानंतर वादळी वाऱ्यासह आष्टी तालुक्यात मोठ्या प्रमाणात गारपिटाचा माराही झाला तेव्हा सुद्धा जास्तीत जास्त फळे गळलेली होती आणि आता मात्र एप्रिल व मे महिन्यात वर्धा जिल्ह्याचे तापमान हे देशामध्ये पहिल्या नंबर वर वाढलेले असून झाडे जगतील की मरतील हा मोठा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा आहे या गारपिटावेळी प्रशासनाच्या वतीने पंचनामे सुद्धा करण्यात आले परंतु आजपर्यंत मात्र कुठल्याही प्रकारची हालचाल दिसून न आल्याने शेतकरी वैतागून गेलेले आहेत आता मात्र आपल्या बागा कशा टिकून राहतील याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागलेले आहेत जमिनीतील पाण्याची पातळी ही अतिशय खोल गेली असून पाण्याचा तुटवडा असल्याने बागा वाळत आहेत म्हणून शासन प्रशासनाच्या वतीने शेतकऱ्यांना भरीव मदत करण्याची गरज निर्माण झालेली आहे एकीकडे निसर्गाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान केले तर आता सूर्य आग ओकत असल्याने शेतकरी मोठ्या अडचणीत सापडलेला आहे आंब्याबाराचे नियोजन करताना शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात खर्च लावावा लागला त्यानंतर सुद्धा मोठ्या प्रमाणात आर्थिक खर्च झाला परंतु झाडांना फळे मात्र राहिलेली नाही त्यामुळे हा शेतकरी कर्जबाजारी झाला असून आर्थिक संकटात सापडलेला आहे याची दखल लवकरात लवकर घेण्याची मागणी शेतकरी करीत आहे हे विशेष.