धर्मदाय आयुक्त यांच्या शेड्युलच्या प्रतीमध्ये फेरफार केल्या प्रकरणी शहरातील ७ व्यक्तीवर फसवणूकीचा गुन्हा दाखल..

0

हिंगणघाट : २८ नोव्हेंबर स्थानिक माहेश्वरी युवक मंडळाचे ट्रस्ट तसेच सहायक यांच्या माहितीशिवाय धर्मदाय आयुक्त यांच्या शेड्युलच्या प्रतीमध्ये नियमबाह्य फेरफार केल्या प्रकरणी ७ जणांवर विरोधात शहर पोलिस ठाण्यात फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार स्थानिक रहिवासी रामकुमार जुगल किशोर डागा,विनोद अशोक मोहता,मुरली रामचंद्र लाहोटी, संजय गणेशीराम डालीया,आशिष वल्लभदास राठी, उदय विजयसिंग मोहता,प्रेमकुमार राजकुमार जाजु यांनी माहेश्वरी युवक मंडळाचे ट्रस्ट आणि सहायक यांच्या माहितीशिवाय धर्मदाय आयुक्त यांनी शेड्युलच्या प्रतीमध्ये फेरफार आरोप करण्यात आला आहे.आणि शेड्युल १ मध्ये त्यांनी नावे समाविष्ट केली.ते ट्रस्टचे विश्वस्त असल्याचे दाखवुन त्यानुसार फसवणुक केली.स्थानिक माहेश्वरी युवक मंडळाचे मारोती वार्ड येथील ट्रस्ट यांचे तक्रारी वरुन गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास हिंगणघाट पोलीस करीत आहे.

ईकबाल पहेलवान साहसिक न्यूज-24

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!