वर्धा / शिवसेना पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे तसेच धर्मवीर आनंद दिघे यांच्या प्रेरणेने शिवसेनेचे प्रमुख नेते तथा राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात राज्यात विकासात्मक कामाचा झंझावात सुरु असून जिल्ह्यात शिवसेना पक्ष गावपातळीवर पोहचवण्यासाठी संपर्कप्रमुख अशोक शिंदे यांच्या मार्गदर्शनात तसेच जिल्हाप्रमुख राजेश सराफ तसेच जिल्हाप्रमुख गणेश इखार यांच्या नेतृत्वात संघटनात्मक काम सुरु असून नुकतेच धामणगाव (वाठोडा) येथील शिवसेना शाखेची कार्यकारणी जाहीर करण्यात आली.
ठाकरे मार्केट येथील जिल्हा संपर्क कार्यालयात (दि.१४ फेब्रुवारी) रोजी संघटनात्मक बैठक पार पडली.या बैठकीचे अध्यक्ष जिल्हाप्रमुख राजेश सराफ होते तर महिला आघाडी जिल्हा संघटिका वंदना भुते तसेच तालुका प्रमुख राहुल चहांदे यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी धामणगाव(वाठोडा)शाखा प्रमुख अभय होणाडे, उपशाखा प्रमुख अंकुश येलेकर तसेच वर्धा तालुका उप-प्रमुख प्रशांत भगत,सेलू तालुका उप-प्रमुख मंगेश सहारे, वायफड जिल्हा परिषद सर्कल प्रमुख प्रविण भोयर यांची नियुक्ती जिल्हाप्रमुख राजेश सराफ यांचे हस्ते पत्र देऊन जाहीर करण्यात आली. तसेच महिला आघाडी वायफड जिल्हा परिषद सर्कल प्रमुख मयुरी राजेंद्र देशमुख, महिला आघाडी धामणगाव(वाठोडा)शाखा प्रमुख वैशाली विजय राऊत यांची नियुक्ती महिला आघाडी जिल्हा संघटिका वंदना भुते यांनी नियुक्ती पत्र देऊन जाहीर केली. बैठकीला धामणगाव (वाठोडा)शाखा सदस्य योगेश शेंदरे,विक्की लांडे,शिवम राऊत,अजय राऊत,प्रणय कोहळे,श्रावण मुंडेकर,आशिष डंभारे,प्रविण चाफेकर,अमोल मांढरे आदी शिवसैनिकांची उपस्थिती होती.