नंदोरी कोरा रोडची दुरावस्था..रखडलेल्या कामाने नागरिकांचे हाल बेहाल..
परिसरातील अनेक गावकरी अपघातात होत आहे अपंग…
15 दिवसात रस्त्याचे बांधकाम तात्काळ सुरू न केल्यास संतापलेले अतूल वांदिले यांचा रस्ता रोको आंदोलनाचा ईशारा….
परिवर्तन जनसंवाद यात्रेदरम्यान कोरा सर्कल मधील नागरीकांनी मांडली रोडची व्यथा…
राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले यांनी दिला परिवर्तन यात्रे दरम्यान आंदोलनाच्या ईशारा…
चार वर्षा पासून नंदोरी ते कोरा रोड चे काम रखडलेले..
परिवर्तन यात्रेच्या माध्यमातून १९ दिवसात १८७ गावांना अतुल वांदिले यांनी दिली भेट…
समुद्रपूर : नंदोरी ते कोरा महामार्गावरील रोडचे बांधकाम १५ दिवसात सुरू न झाल्यास रास्ता रोको आंदोलन करणार राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले यांनी दिला आंदोलनाच्या ईशारा…नंदोरी ते कोरा या रोडचे बांधकाम मागील तीन ते चार वर्षापासून चालू असून ते रखडलेले आहे या कामाचे पैसे न मिळाल्यामुळे काम थांबवले असल्याचे पुढे येत आहे परिवर्तन यात्रेदरम्यान अतुल वांदिले यांनी प्रशासनाला पंधरा दिवसाच्या आत या नंदोरी ते कोरा महामार्गावरील रोडचे बांधकाम चालू न केल्यास रास्ता रोको आंदोलनाच्या इशारा दिला आहे.नंदोरी ते कोरा हा मुख्य मार्ग असून या रोडने दररोज हजारो लोक ये-जा करीत असतात लोकांना दवाखान्यात जाण्यासाठी याच मार्गाने प्रवास करावा लागतो.या मार्गावरील अनेक अपघात देखील झाले आहे. मागील तीन ते चार वर्षापासून या रोडचे बांधकाम राखडलेले आहे.लोकांना जाण्या येण्यासाठी या रोडने हा नाहक त्रास सहन करावा लागतो. रोड चे बांधकाम रखडलेले असल्यामुळे मार्गावरील धुळीचे साम्राज्य आहे. रोड वरती मोठ्या प्रमाणात गिठ्ठी पडलेली असल्याने अनेक गाड्या पंचर देखील होत आहे.या नंदोरी कोरा रोड चे बांधकाम १५ दिवसात सुरू करा अन्यथा रास्ता रोको आंदोलन करण्याच्या ईशारा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले यांनी दिला आहे.यावेळी समुद्रपूर तालूका महेश झोटिंग पाटील, गणेश वैरागडे संचालक कृ.उ.बा. समिती, संजय लोणकर,संजय तुराळे,कोरा सरपंच वैशाली लोखंडे, उसेगाव सरपंच विलास तिमांडे, माजी पं. समिती सदस्य अशोक झाडे,, माजी पं. समिती सदस्य धनपालजी भगत, ग्रा.सदस्य संगीता वैरागडे, ग्रा सदस्य आशा नारनवरे, तंटामुक्ती अध्यक्ष शंकर चौके, अरुण गुंडे, येवले सर,वासुदेव वैरागडे, अमोल मेंढुले,प्रफुल आंबटकर,सुभाष चौधरी, प्रा टिपले, कोरा गावातील सर्व नागरिक व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
ईकबाल पहेलवान साहसिक न्यूज -24