नगर परिषदेच्या खाजगी सफाई कामगारांचा संप अखेर मागे.
देवळी : नगर परिषदेतील खाजगी कंत्राटी सफाई कामगारांचे सोमवारपासून कामबंद आंदोलन सुरू होते. मासिक पगारामध्ये वाढ, पी.एफ. मधिल अनियमितता, विमा कवच व इतर मागण्यांना घेऊन कामगारांनी संप पुकारला होता.सर्व कामगारांनी संप पुकारल्यामुळे नागरिकांच्या घरातील डस्टबिन कचऱ्याने तुडुंब भरले होते.तसेच समर्थ बहुउद्देशीय संस्था,यवतमाळ चे ठेकेदार यांच्याशी चर्चा करून त्यांनी युवा संघर्ष मोर्चाच्या कार्यालयात यशस्वी चर्चा घडवून आणली.चर्चे दरम्यान युवा संघर्ष मोर्चाचे किरण ठाकरे, प्रविण कात्रे, गौतम पोपटकर, ठेकेदार सौरभ बिसेन, कामगार प्रतिनिधी गजानन करलुके,सचिन सोनटक्के, विनोद निधेकर, विलास शेंद्रे, शंकर मेश्राम, ओमप्रकाश टिपणे उपस्थित होते. यावेळी प्रत्येक कामगाराच्या मासिक पगारात ₹ ७५०/- रुपये एवढी वाढ करण्याचे मान्य केले. पीएफ मधील अनियमितता दूर करण्याचे मान्य केले. कामगारांना विमा कवच, सुरक्षा उपकरणे सुद्धा देण्याचे ठरविण्यात आले. सर्व मागण्या मान्य झाल्यानंतर आंदोलनस्थळी जावून सर्व कामगारांना संपाच्या तोडग्याविषयी सविस्तर माहिती देण्यात आली.अखेर चार दिवसांच्या कामबंद आंदोलना नंतर संपावर असलेल्या ३० सफाई कामगारांच्या लढाईला यश आले.
सागर झोरे साहसिक न्यूज-24 देवळी