नवजात बालकाला कचऱ्यात फेकले अर्भक

0

धक्कादायक बातमी

साहसिक न्युज 24
प्रतिनिधी/कारंजा:
वर्ध्यातील बोंदरठाणा येथे गावशेजारी नवजात बालकाचे जिवंत अर्भक फेकल्याने खळबळ उडाली…आईच्या गर्भातून बाहेर आल्यावरच या बाळाचा संघर्ष सुरू झालाय…मातीने भरलेलं त्याच शरीर आणि ओली नाळ अश्या अवस्थेत पहाटे 2 वाजताच्या सुमारास गावाबाहेर कचऱ्यात फेकले ज्यांनी जन्म दिला त्यांनी कचऱ्यात फेकल याहून मोठं दुःख काय…गजाम यांच्या घराशेजारी महिलेला रडण्याचा आवाज आलाय… आपल्या कुटुंबसह पाहणी केली असता धक्काच बसला तर काय एक तासापूर्वी जन्माला आलेलं जिवंत बाळा आढळले…याबाबत गावातील आशा सेविका व अंगणवाडी सेविकेला माहिती दिली…घटनास्थळी धाव घेत पाहणी केली असता अर्भकाचे पूर्ण शरीर मातीने भरलेलं दिसून आले..पहाटेच्या थंड हवेत बाळाचे शरीर थंड आले होते याबाबत पोलिसांना माहिती देत तातडीने अर्भकाला ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले…बाळाची प्रकृती बिघडली असल्याने त्याला पावडर दूध पाजण्यात आले… मात्र पावडर दूध पित नसल्याने नवजात बाळाला वर्धा येथे रेफर करण्यात आले… बाळाला वाचवण्यासाठी आशा सेविका, अंगणवाडी सेविका ,डॉक्टर ,पोलीसाकडून प्रयत्न केले जात आहेय..सध्या बाळाला वर्धा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात येत आहेय… मात्र पुरुष जातीचे नवजात बाळ फेकून देणाऱ्या निर्दयी आईवडिलाला काही वाटलं नसेल…नकोशी सारखा बाळ नकोसा झाला तर नाही ना ….पोटच्या बाळाला फेकून देणं मनाला काही वाटलं नसेल…तेही अंगावर थोडं कापड लावायचं वाटलं का नाही कचऱ्यात फेकून दिल…या आईवडिलांचा शोध सुरू केला असून यांच्यावर कठोर कारवाई व्हावी यासाठी नागरिक संताप व्यक्त करत आहे…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!