आष्टी (शहीद) /ग्रामपंचायत नवीन आष्टी कक्षेतील आयमा येथे गेल्या काही वर्षापासुन कमलनयन जमनालाल बजाज फाउंडेशन विषमुक्त शेतीचा प्रचार व प्रसार करीत आहे.कमलनयन जमनालाल बजाज फाऊंडेशनचा उद्देश विषमुक्त अन्न, भाजीपाला,फळे तयार करणे हा आहे.यातही अगोदर कुटुंबा करीता वापरणे व उरलेला माल गावात विक्री करणे हा प्रमुख उद्देश आहे.तसेच यातुन कुटुंबाचे आरोग्य जपणे व गावातील समुदायांचे आरोग्य जपणे हा पण उद्देश आहे.या उद्देशाने जमनालालक्त बजाज फाउंडेशनने आष्टी तालुक्यातील २००० शेतकऱ्यांना आता पर्यंत जन जागरुत केलेले आहे.त्यातुन १००% परीपूर्ण विषमुक्त असलेल्या शेतकऱ्यांना विषमुक्त मालाला दोन पैसे कसे जास्त मिळतील या उद्देशाने आष्टी शहरातील ग्राहकांना विषमुक्त अन्न,भाजिपाला,फळे योग्य दरात उपलब्ध व्हाव्यात या करीता दर रविवारला सकाळी ८ ते १२ पर्यंत नवीन आष्टी ग्रामपंचायत कक्षेतील आयमा (बिहाळा चौक) या ठिकाणी शेतकरी आपल्या भाजीपाला व शेतमाल विक्रीस उपलब्ध करीत आहे.कमलनयन जमनालाल बजाज फाउंडेशनया या स्तुत्य उपक्रमाची सुरुवात केल्याने ग्राहकांचा खुप मोठ्या प्रमाणात चांगला प्रतिसाद मिळत आहे.ग्राहक आरोग्या विषयी जागरुक होत आहे.आष्टी शहरातील ग्राहकांनी या विषमुक्त भाजी बाजार उपक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन कमलनयन जमनालाल बजाज फाउंडेशन कडुन करण्यात आले आहे.