नागपूर अमरावती महामार्गावर ट्रक ‘द बर्निग’ हॉटेल मध्ये जेवायला गेल्याने ट्रक चालक व क्लिनर बचावला

0

प्रतिनिधी / वर्धा:
अमरावती नागपुर राष्ट्रीय महामार्गावर राजणी शिवारात रात्री 10 वाजताच्या सुमारास उभ्या ट्रकला अचानक आग लागली या आगीत कोंबड्याचे खाद्य जळून खाक झाले…याघटनेमध्ये जवळपास 20 लाखाचे नुकसान प्राथमिक माहिती आहेय.
मालेगाव येथून नागपूरला कोंबड्याचे खाद्य घेऊन निघाला होता. वाटेतच चालक व क्लिनर जेवण्यासाठी वर्धा जिल्ह्यातील राजनी जवळील हॉटेल मध्ये जेवण्यासाठी चालकाने रस्त्याच्या कडेला उभा करून हॉटेलमध्ये जेवण्यासाठी गेले असताना काही क्षणातच ट्रकच्या समोरील कॅबिनला आग लागली.आग कशामुळे लागली याचाही अद्यापही माहीती प्राप्त झाली नाही. चालकाचे ट्रक कडे लक्ष जाताच उभा ट्रक जळताना आढळून आला.काही वेळातच आगीने आपले रौद्ररूप धारण करत ट्रकला आपल्या कवेत घेतले.ट्रकची समोरील केबिन पूर्णतः जळून खाक झाली तर ट्रक मध्ये असलेले खाद्य जळाले…या घटनेची माहिती कारंजा पोलिसांना मिळताच घटनास्थळी दाखल झाले…आग विझवण्यासाठी अग्निशमन नसल्याने टोल प्लाझा वरील टँकर पाचारण करण्यात आले तोपर्यंत मात्र ट्रक व खाद्य जळून खाक झाले होते…या तालुक्यात अग्निशमन दल नसल्याने ट्रक विझवण्यात प्रयत्न झाले नाही..सकाळपर्यंत ट्रक मधील खाद्य जळत असल्याचे दिसून आले. कारंजा पोलीस रात्री घटनास्थळी दाखल होऊन घटनेची नोंद घेण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!