नागपूर -हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावर जीवघेणे मोठे खड्डेच खड्डे ; खासदारांचे व जिल्हाधिकारी ह्यांचे दुर्लक्ष….

0

🔥नागपूर -हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावर जीवघेणे मोठे खड्डेच खड्डे ; खासदारांचे व जिल्हाधिकारी ह्यांचे दुर्लक्ष.🔥नागरिक हतबल;आवश्यक उपाय योजना करण्याची मागणी.

हिंगणघाट -/ शहराच्या मध्यभागातून नॅशनल हायवे- ४४ गेला आहे .हा महामार्ग दोन मोठ्या शहरांना जोडलेला असल्यामुळे ह्या मार्गावर मोठ्या प्रमाणात मोठे उद्योग उभारण्यात आले आहे त्यामुळे नेहमीच मोठ्या वाहनांची वर्दळ असते.मागील ३-४ वर्षात ह्या महामार्गावर खूप मोठ्या प्रमाणात जड वाहतून वाढली असून अपघात मोठ्या प्रमाणात होत आहे.सध्या पावसाळा सुरू असल्यामुळे खड्ड्यांचा संख्येत आणखी वाढ झाली आहे .वडनेर ते जाम ह्या मार्गावर ३ ते ४ फुटाचे मोठे खड्डे पडले आहे .त्यामुळे आणखीनच अपघातात जास्त वाढ झाली आहे .त्यामुळे नागरिकांना जीव मुठीत धरून जावे लागते ,वेळ प्रसंगी जीवास मुकावे सुध्दा लागते.मागील ४-५ वर्षात शहरातील ९-१० जणांचा जीव सुध्दा शहराच्या हद्दीत गेला आहे.मागील १ महिन्यात खड्ड्यांमुळे २ जड वाहतूक करणारे चार चाकी वाहने पलटी होऊन नुकसान झाले आहे ,सुदैवाने त्या अपघात कुणाची जीवितहानी झाली नाही.तरी सुध्दा प्रशासनाला जाग आली नाही. हा महामार्ग हिंगणघाट शहरातून गेल्या असल्यामुळे स्थानिक नागरिकांचे सतत येणे जाणे सुरू असते.ह्या महामार्गावर मोठे उद्योग,एमआयडीसी,शहरी वसाहत,पेट्रोल पंप,बँका,खासगी दवाखाने,महाविद्यालये ,उपजिल्हा रुग्णालय,विदर्भाची कृषी उत्पन्न बाजार समिती, डि मार्ट ,रिलायन्स स्मार्ट बाजार ,कोचिंग इन्स्टिट्यूट,शॉपिंग कॉम्प्लेक्स व इतर मोठे व्यावसायिक आस्थापने असल्यामुळे नेहमी वाहनांची वर्दळ असते .त्यामुळे कधी कधी खड्डा चुकविण्याचा नादात तर कधी मोठे जड वाहन खड्ड्यातून जात असल्याने अपघातात जास्त वाढ झाली आहे.तरी सुध्दा रस्ता सुरक्षा समिती झोपेचे सोंग घेऊन आहे का ? असा प्रश्न पडतो आहे

जिल्हा वर्धा येथे जिल्हा रस्ता सुरक्षा समिती कार्यरत असून, रस्त्यांवरील अपघातांची संख्या कमी करणे, रस्ता सुरक्षा उपाययोजना करणे आणि अपघात प्रवण स्थळे दुरुस्त करणे यांसारखी कामे समितीद्वारे केली जातात. या संदर्भात नुकतीच जुलै महिन्यात खासदार अमर काळे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात रस्ता सुरक्षा समितीची बैठक पार पडली.जिल्हाधिकारी हे ह्या समितीचे सचिव आहे. रस्त्यांवरील अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी उपाययोजना करणे,अपघात प्रवण स्थळे दुरुस्त करणे,जनजागृती मोहिम राबवणे,गतिरोधक बसवण्याबाबत निर्णय घेणे आणि त्यावर देखरेख ठेवणे,रस्त्यांवरील प्लास्टिक फायबरचे गतिरोधक काढून डांबरीकरणाचे गतिरोधक बसवण्यासारख्या बदलांसाठी निर्देश देणे हे जिल्हा रस्ता सुरक्षा समितीची कार्ये आहे.पण ही समिती फक्त बैठक घेण्यापुरतीच नावाची ठरली आहे. कुठलीही उपाय योजना हिंगणघाट शहरातील राष्ट्रीय महामार्गावर केल्या गेली नाही.शहरात सरकारी दवाखाना चौक व कलोडे चौक हे दोन ब्लॅक स्पॉट घोषित केले आहे .ह्या ठिकाणी उड्डाण पुलाचे काम सुरू असल्यामुळे ट्रॅफिक नेहमीच जाम असते.ह्या ठिकाणी खूप मोठे खड्डे पडून असल्यामुळे अपघाताची मालिका सतत सुरू आहे त्यामुळे खड्डे बुजवण्याची,ब्रेकर बसविण्याची व दोन्ही चौकार वाहतूक पोलिस कायमस्वरूपी उपलब्ध करून देण्याची मागणी ह्या आधी निवेदनातून करण्यात आली होती.ह्या मागणी कडे जिल्हा प्रशासन,पोलिक प्रशासन व जिल्हा रस्ता सुरक्षा समिती जाणीव पूर्वक दुर्लक्ष करीत आहे का ? व निष्पाप जनतेचा जीव जाण्याची वाट बघत आहे का ? हा प्रश्न शहरातील नागरिकांना पडलेला आहे व नागरिकांच्यावतीने रोष व्यक्त करण्यात येत आहे.तसेच हिंगणघाट येथे नेहमी फक्त राजकीय कार्यक्रम व सत्कार समारंभात उपस्थिती दर्शविणारे खासदार अमरभाऊ काळे हे सुरू असलेल्या विकास कामाच्या ठिकाणी प्रत्यक्षात पाहणी करून आवश्यक उपाय योजना करण्याचे अधिकाऱ्यांना सूचना करणार का ? ह्याची हिंगणघाटची जनता वाट बघत आहे.
येत्या १० दिवसात विविध मागण्यासाठी कायमस्वरुपी उपाय योजना न केल्यास शहरातील नागरिकांच्या वतीने लवकरच महामार्गावर रस्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे. ह्या सर्व घडामोडीला खासदार व प्रशासन सर्वस्वी जिम्मेदार राहतील .त्यामुळे आधीच प्रशासनाने व लोकप्रतिनिधींनी दखल घ्यावी अशी नागरिकांची मागणी आहे.

ईकबाल पहेलवान साहसिक News-/24

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!