पंचनामे न करता शेतकऱ्यांना सरसकट प्रति हेक्टरी ५० हजार रुपयांची मदत करा.

0

सिंदी (रेल्वे) : सोयाबीन पिकावर आलेल्या येलो मोझॅक, खोडकिडी, बुरशी व करपा या रोगराईमुळे वर्धा जिल्ह्यातील बहुतांश सर्वच शेतकऱ्यांचे सोयाबीन पिक उध्वस्त झाले. त्यामुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावल्या गेला.हाती आलेले पिक पूर्णतः गेल्यामुळे शेतकरी उद्ध्वस्त झाले असून त्यांच्यावर फार मोठे आर्थिक संकट कोसळले आले. करीता सोयाबीन नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना पंचनामे वगैरे न करता सरसकट ५०,०००/- ( पन्नास हजार ) रुपये प्रति हेक्टरी शासनाने मदत द्यावी, या मागणीचे निवेदन शेतकऱ्यांचा जाणता राजा, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा व राष्ट्रीय अध्यक्ष शरदचंद्र पवार यांना हिंगणघाट मतदारसंघाचे माजी आमदार राजु तिमांडे, सहकार नेते व हिंगणघाट बाजार समितीचे सभापती अँड. सुधिरबाबु कोठारी, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे हिंगणघाट तालुकाध्यक्ष विनोद वानखेडे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे हिंगणघाट शहर अध्यक्ष विठ्ठल गुळघाणे, महासचिव आफताब खान यावेळी उपस्थित होते. दरम्यान, शरद पवार यांच्याशी वर्धा जिल्ह्यातील सध्याच्या राजकीय परिस्थितीवर तसेच येणाऱ्या निवडणुकीबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.

  दिनेश घोडमारे साहसिक न्यूज-24

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!