पळसगाव बाई येथे खासदार निधीतील व्यायाम शाळा भूमिपूजन सोहळा संपन्न.

0

पळसगाव बाई येथे मोठ्या उत्साहात खासदार निधीतून मंजूर करण्यात आलेल्या व्यायाम शाळेचे भूमिपूजन करण्यात आले, भूमिपूजन सोहळा चे उद्घाटक खासदार रामदासजी तडस साहेब, प्रमुख अतिथी म्हणून श्री रवींद्रभाऊ कोटबंकर, संपादक सहासिक साप्ताहिक, पवनार येथील जयंतजी गोमासे, श्री अमोल सोनटक्के, सरपंच, श्री गजानन गिरडे, तालुका प्रभारी किसान अभियान, सरपंच धीरज लेंडे, उपसरपंच शारदा बोरकुटे, ग्रामपंचायत सदस्य व पदाधिकारी, एस एस एस के क्रीडा मंडळाचे खेळाडू व गावकऱ्यांच्या उपस्थितीत उद्घाटन सोहळा पार पडला, उद्घाटक प्रसंगी माननीय खासदार रामदासजी तडस यांनी पळस गावचे सरपंच धीरज लेंडे यांच्या नेतृत्वात जनतेला सोबत घेऊन अनेकविध विकास कामे, कल्याणकारी योजना, राबवून जिल्ह्यात वाख्याण्याजोगे काम केले असून गावाची ओळख निर्माण केली आहे, तसेच गावाला अनेक पुरस्कारही मिळवून दिले असून विकास कामाला विरोधकांनीही अडसड न करता सहकार्याची भूमिका घेतली पाहिजे, तसेच सरपंच सचिव आणि ग्रामपंचायत सदस्य यांनी गाव विकासाचा रथ हाकताना गावाचा विकास हेच एक ध्येय ठेवून देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी यांचे प्रत्येक गावाचा सर्वांगीण विकास हे स्वप्न पूर्ण केले पाहिजे, कल्याणकारी योजना, जनमानसात पर्यंत पोहोचवल्या पाहिजे व त्याचा फायदा जनसामान्यांना करून दिला पाहिजे असे मत व्यक्त केले,प्रसंगी धीरज लेंडे यांनी खासदार रामदासजी तडस यांचे आभार मानत आधीही गावात असणारा महत्त्वाचा रस्ता करिता खासदार निधी व गावकऱ्यांच्या मागणीनुसार जिल्हा क्रीडा विभागामार्फत आधीही गावात व्यायामशाळा मंजूर होऊन सात लक्ष ला दोन लक्ष पूरक निधी म्हणून खासदार फंड उपलब्ध करून दिला होता, गावातील काँग्रेस पक्षाच्या उपसरपंच शारदा बोरकुटे, यांनीही व्यायामशाळेची मागणी करत उपोषण केले असता भारतीय जनता पार्टीचे श्री जयंतजी गोमासे उपसरपंच यांचे व्याही यांनी तडस साहेब यांच्या कानावर ही बाब टाकली असता तडस साहेब यांनी मला फोन करून विचारले असता, आपण आधीपासूनच उपसरपंच यांना दुसऱ्या व्यायामशाळा करता निधी उपलब्ध करून देऊ असे उपोषण स्थळी भेट देऊन सांगण्यात आले होते, त्यामुळे गावातील लोकांचा विचार लक्षात घेता शाळेच्या आवारात न घेता आजूबाजूला घ्यावी असे मत व्यक्त केले व गाव मोठे असल्यामुळे आपण खासदार निधीतून व्यायामशाळा करिता निधी उपलब्ध करून द्यावा ही विनंती केली , त्याचप्रमाणे श्री गजाननभाऊ गिरडे यांनी व एस एस एस के क्रीडा मंडळाच्या खेळाडूंनी ही व्यायामशाळा करता निधी उपलब्ध करून द्यावा ही मागणी रेटून धरली होती, रविभाऊ कोटबंकर यांचाही व्यायामशाळा मंजूर करण्यात मोलाचे सहकार्य प्राप्त झाले आहेत ,खासदार रामदासजी तडस व आमचे कार्यसम्राट आमदार समीर भाऊ कुणावांर यांनी गावाकरता आजपर्यंत भरघोस निधी उपलब्ध करून देत गावाचा चेहरा मोहरा बदलला असून निधी देताना पक्षाचा विचार न करता गावाचा विचार करून काम करण्याची पद्धत ही वारंवार त्यांच्या कार्य शैलीतून जाणवत असते असे मत सरपंच धीरज लेंडे यांनी व्यक्त केले,

साहसिक न्यूज-24 वर्धा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!