पवनारातील गणपती विसर्जन कुंडाचे काम तत्काळ पूर्ण करून सफाई करण्यात यावी; जिल्हाधिकारी यांना विश्व हिंदू परिषद, बजरंग दलाचे निवेदन
साहसिक न्यूज24
प्रतिनिधी/ पवनार:
येथे सेवाग्राम विकास आराखड्यात सुरू असलेल्या गणपती विसर्जन कुंडाचे काम मागील ५ वर्षा पासून सुरू आहे. या कामात लाखो रुपये खर्च करून कुंडाच तयार करण्यात आला असून कुंडातील दूषित पाणी फिल्टर करून नदी पात्रात सोडणारी यंत्रणा मात्र अजूनही उपलब्ध नसल्याने त्या दूषित पाण्यात गणपती विसर्जन सुरू आहे. त्यातच कुंडातील दूषित पाणी थेट नदी पात्रात सोडण्यात येत आहे. इकडे शासन म्हणते की नदी पत्रात गणपती विसर्जन केल्याने पाणी दूषित v केमिकल युक्त होते. त्यातच कुंड लहान असून त्यात मोठे गणपती व देवी यांचे विसर्जन करता येत नाही. त्यामुळे देवी देवतांना कुंडात शिरवल्या नंतर त्यांची विटंबना होते. तसेच हिंदू धर्मात देवी देवतंची पूजा १० दिवस मोठ्या श्रध्देने केल्या नंतर जर त्यांची विटंबना होत असेल तर हे महापाप आहे. आणि हे महापाप मागील २ वर्षा पासून कुंडाच्या माध्यमातून पवनार येथील धाम नदीवर बांधण्यात आलेल्या कुंडात सुरू आहे. हे दृश्य बजरंग दलाचे जिल्हा संयोजक बबलू राऊत यांच्या निदर्शनास येताच त्यांनी त्याची तत्काळ दाखल घेवून आज दिं ६ सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी यांना भेटून कुंडाच्या माध्यमातून हिदू धर्माच्या देवी देवतांची जी विटंबना सुरू आहे ती तत्काळ बंद करावी व कुंडाचे बाकी राहिलेले बांधकाम तत्काळ सुरू करावे अशा आशयाचे निवेदन विश्व हिंदू परिषद, बजरंग दलाचे जिल्हा प्रभारी मुन्ना यादव, जिल्हा कोषाध्यक्ष अतुल देशपांडे, जिल्हा संयोजक महेश (बबलू) राऊत, जिल्हा सह संयोजक सचिन चांडक,नगर संयोजक किरण उपाध्याय, प्रखंड सह मंत्री रवी बडवाईत, प्रचार प्रसार प्रमुख आदित्य कावळे, प्रचार प्रसार प्रमुख गोल्टी बगा, सदस्य अनिल मुंगले यांच्या उपस्थितीत देण्यात आले.