पाणीपुरवठा विभागात RTI घोटाळा…..!

0

🔥पाणीपुरवठा विभागात RTI घोटाळा,१५०० पानांची माहिती” सांगून फसवणूक – प्रत्यक्ष दिली फक्त १३९ पाने!

हिंगणा -/ जिल्हापरिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागातील R.O. प्रकल्पांच्या कामांवर जबरदस्त भ्रष्टाचार व घोटाळ्याचे सावट असल्याचे स्पष्ट होत आहे.कारण, माहिती अधिकार कायद्यानुसार मागविलेली माहिती देताना संबंधित विभागाने अर्जदाराची दिशाभूल केली आहे.
अर्जदार गजानन वामनराव ढाकूलकर हिंगणा यांनी वॉटर फिल्टरच्या सर्व हेडमधील कामांबाबत माहिती मागितली होती. नियमानुसार माहिती ३० दिवसांत मिळणे बंधनकारक असतानाही विभागाने वेळकाढूपणा करून सुरुवातीला ३ हजार रुपयांचे शुल्क मागितले. अपिलीय अधिकाऱ्यांनी “माहिती विनाशुल्क द्यावी” असा आदेश दिल्यानंतरही, जन माहिती अधिकारी व सहा. कार्यकारी अभियंता यांनी सरळसरळ आदेशाचे उल्लंघन केले.
यात सर्वात धक्कादायक बाब म्हणजे, दिनांक २ जून २०२५ रोजी पाणी पुरवठा विभागाने पत्राद्वारे “आपली माहिती १५०० पानांची आहे व शुल्क ३ हजार रुपये भरावे लागतील” असे नमूद केले. मात्र प्रत्यक्ष १२ सप्टेंबर २०२५ रोजी माहिती देताना केवळ १३९ पानेच दिली गेली !
यावरून हे स्पष्ट होते की,
१) विभागाने मुद्दाम चुकीची पान संख्या दाखवून अर्जदारास गंडा घालण्याचा प्रयत्न केला.
२) मोठी रक्कम दाखवून अर्जदार माहिती मागायचीच नाही असा दबाव आणला गेला.
३) खरी व परिपूर्ण माहिती दिल्यास विभागातील R.O. प्रकल्पांतील लाखो रुपयांचा भ्रष्टाचार बाहेर येईल, म्हणून माहिती दडवली गेली.
हा प्रकार म्हणजे माहिती अधिकार कायद्याचे निर्लज्ज उल्लंघन आहे. अपिलीय अधिकाऱ्यांच्या आदेशालाच केराची टोपली दाखवून माहिती झाकली गेली. त्यामुळे ग्रामीण पाणीपुरवठा विभागावर भ्रष्टाचार झाकण्याचा आणि जनतेच्या हक्कांवर गदा आणण्याचा ठपका ठेवला जात आहे.
प्रश्न असा उपस्थित होतो की – जर खरंच १५०० पानांची माहिती असती तर ती अचानक १३९ पानांमध्ये कशी बसली? उर्वरित पानांमध्ये कोणते दस्तऐवज होते ? आणि ते लपवून कोणाला वाचवले जात आहे ?
हा प्रकार फक्त ढिलाई नाही, तर भ्रष्टाचार लपवण्यासाठी केलेली संगनमताने आखलेली कटकारस्थान आहे. जनतेच्या पाण्यासाठी असलेले प्रकल्प व कोट्यवधींचे बजेट जर घोटाळ्याच्या खाईत जात असेल तर त्याचा हिशेब जनतेला मिळालाच पाहिजे.
नागरिकांच्या हक्कांची अशा रीतीने गळचेपी करणाऱ्या अधिकारी वर्गावर तातडीने चौकशी करून कडक शिस्तभंगाची कारवाई व्हावी, अशी मागणी आता गजानन ढाकुलकर कडून केल्या जात आहे.

गजानन ढाकुलकर साहसिक News -/24 हिंगणा 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!