पुलावामा मधील झालेल्या हमल्यातील वीर शहिदांना देण्यात आली श्रध्दांजली…
जयहिंद फाउंडेशन वर्धा तर्फे वीर शहिदांना देण्यात आली श्रद्धांजली.
वर्धा / जय हिंद फाउंडेशन वर्धा तर्फे तसेच जयपवनसुत हनुमान मंदिर ट्रस्ट वर्धा, आणि माजी सैनिक परिवार यांच्या कडून शाहिद तुकाराम ओंबळे सभागृह जुनी म्हाडा कॉलोनी,वर्धा येथे पुलावामा हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांसाठी श्रद्धांजली पर कार्यक्रम घेण्यात आला.
जगभरात आज ‘व्हॅलेंटाईन डे’ साजरा केला जात असताना भारतात मात्र हा दिवस काळा दिवस म्हणून पाळला जात आहे. पाच वर्षा अगोदर आजच्याच दिवशी जम्मू-काश्मीर येथील पुलावामा जिल्ह्यातील लेथापोरा येथे केंद्रीय रिझर्व पोलीस फोर्सच्या ताफ्यावर दुपारी ३.१५ वाजता आत्मघाती हल्लेखोरांच्या भ्याड हल्ल्यात ४० सैनिकांचा घटनास्थळीस मृत्यू झाला होता. त्यांच्या सर्वोत्तम बलिदानाला न विसरता स्मरण करण्यासाठी, जयहिंद फाउंडेशन वर्धा, जयपवनसुत हनुमान मंदिर ट्रस्ट, वर्धा,माजी सैनिक,वर्धा द्वारा श्रद्धांजली चा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी सर्व प्रथम छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला आणि शाहिद तुकाराम ओंबळे यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून शहिदांना श्रध्दांजली अर्पण करण्यात आली.आणि शेवट राष्ट्रगान म्हणून कार्यक्रमाला समाप्त करण्यात आला. कार्यक्रमाचे संचालन तायडे माजी सैनिक यांनी केले.तर प्रस्तावना बिपीन मोघे राष्ट्रीय संकचालक,जयहिंद फाउंडेशन यांनी केले.आणि आभार प्रदर्शन सौ भोयर सदस्या जयहिंद फाउंडेशन यांनी केले या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून श्रीपाद कोलते,डी.जी.एम.पवार ग्रीड,देवळी तसेच प्रमुख पाहुणे म्हणून नायब सुभेदार मंगेश श्रीनाथ,जे भारतीय सेनेतील १६ पंजाब रेजिमेंट मध्ये आरमोरार म्हणून कार्यरत आहे.तसेच यावेळी मंचावर बिपीन मोघे,जयहिंद फाउंडेशन,राष्ट्रीय संचालक शारदाताई कश्यप,कोष्याध्यक्षा अभिमन्यू पवार,सदस्य जयहिंद फाउंडेशन,संजीव ठाकूर सदस्य जयहिंद फाउंडेशन,भानुदास सोमनाथे,सचिव माजी सैनिक पतसंस्था कॅप्टन कांबळे सहसचिव,माजी सैनिक पत संस्था,अशोक फरताडे,संचालक, जय पवनसुत हनुमान मंदिर ट्रस्ट, संजय डबले पूर्व सैनिक, विराजमान होते.तसेच यावेळी जयहिंद फाउंडेशन च्या आणि माजीसैनिक परिवारातील महिला जयश्री चोरे,सुनीता उसेंडी,नंदा पेटकर,उमाटे,सोमनाथे,पूजाताई फुलबांधे,कुमारी उसेंडी,श्रीनाथ ताई,राहुल चांदुरकर,निलेश बुरांडे,गजानन पेटकर,गजानन बावणे,महेंद्र बावणे,देवानंद बोरकर,उमाटे,दिवाकर आसटकर,शरद भालकर,अरुण कोडगिरवार,इत्यादी माजी सैनिक,त्यांचा परिवार तसेच जयहिंद फाउंडेशन चे सदस्य आणि परिसरातील नागरिक उपस्थित होते.
चैताली गोमासे सहासिक न्युज / 24 वर्धा
.