🔥हेच ते राजपूत हॉटेल अँड रेस्टॉरेंट चे आड सुरू होता कुंटखाना🔥हाच तो एपीआय मिलिंद पराटकर यांनी ५ लाख रुपयांच्या बदल्यात कुंतखाना प्रकरण दाबले. 🔥हाच तो किशोर दर्डा चा चेला व स्वतःला प्रतिष्ठित पेपर चा पत्रकार समजणारा हरी ओम् बघेल राजपूत हॉटेल व रेस्टॉरेंट चे आडून चालवीत होता कुंटणखाना.
यवतमाळ -/जिल्ह्यात एकीकडे पोलीस अधीक्षक गुन्हेगारी मोडीत काढण्यासाठी क्राईम मीटिंग घेत असताना, दुसरीकडे त्यांच्याच नाकाखाली आर्णी पोलीस ठाण्याच्या हद्दीत ‘नंगा नाच’ आणि भ्रष्टाचाराचा कळस गाठला गेल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. लोनबेहळ शिवारातील ‘राजपूत’ हॉटेलवर टाकलेली धाड ही कारवाई नसून, चक्क ५ लाखांची ‘वसुली’ करण्यासाठी रचलेला बनाव होता की काय? असा संतप्त सवाल आता उपस्थित होत आहे. २२ जोडपी रंगेहात सापडूनही एकावरही कारवाई न झाल्याने यवतमाळ पोलीस दलाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.नांदेड राज्यमार्गालगत लोनबेहळ येथील एका शेतात असलेल्या ‘राजपूत’ हॉटेलमध्ये गेल्या तीन वर्षांपासून कुंटणखाना राजरोसपणे सुरू होता. बाहेरून केवळ चहा-नाश्त्याचे हॉटेल वाटणाऱ्या या इमारतीच्या आडोशात तासाला २००० रुपये दराने वेश्याव्यवसाय आणि अनैतिक कृत्ये सुरू होती. राजकीय वरदहस्त आणि खाकीतील काही निवृत्त अधिकाऱ्यांच्या पाठबळावर हा व्यवसाय इतका फोफावला होता की, येथे केवळ स्थानिकच नव्हे तर जिल्ह्याबाहेरील ‘प्रतिष्ठित’ पाहुण्यांची मांदियाळी असायची.९ फेब्रुवारी रोजी जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात महत्त्वाची क्राईम मीटिंग सुरू होती. सर्व वरिष्ठ अधिकारी बैठकीत व्यस्त असल्याचा फायदा घेत, आर्णी पोलीस ठाण्याचे API मिलिंद पारडकर आणि यवतमाळच्या फॉरेन्सिक पथकाने या हॉटेलवर छापा टाकला. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एका दुसऱ्या गुन्ह्याच्या तपासासाठी आलेल्या फॉरेन्सिक पथकाला जेवणासाठी गणेश ढाब्यावर नेण्याचे निमित्त करून ही धाड टाकण्यात आली.या धाडीत जे दृश्य दिसले ते थक्क करणारे होते. तब्बल २२ तरुण-तरुणी, विद्यार्थी आणि काही प्रतिष्ठित व्यक्ती नको त्या अवस्थेत रंगेहात पकडले गेले. धक्कादायक बाब म्हणजे, यात एका लोकप्रतिनिधीच्या कन्येचाही समावेश असल्याची चर्चा वाऱ्यासारखी पसरली आहे. मात्र, इतक्या मोठ्या प्रमाणात पुरावे असतानाही पोलिसांच्या रेकॉर्डवर एकही नोंद का झाली नाही? हा सर्वात मोठा प्रश्न आहे.
🔥कायद्याचा मुडदा पाडून ५ लाखांत ‘सेटलमेंट’?
अनैतिक व्यापार प्रतिबंधक कायदा (PITA) नुसार अशा प्रकरणांत कठोर कारवाई होणे अपेक्षित होते. नियमानुसार, अशी कारवाई करण्यासाठी SDPO (उपविभागीय पोलीस अधिकारी) दर्जाचा अधिकारी हजर असणे आवश्यक आहे किंवा किमान PI दर्जाच्या अधिकाऱ्याला ते अधिकार आहेत. मात्र, API मिलिंद पारडकर यांनी वरिष्ठांना कोणतीही पूर्वसूचना न देता, ठाणेदारांच्या मूक संमतीने हे ‘ऑपरेशन’ राबवले. आरोप असा आहे की, पकडलेली २२ जोडपी आणि हॉटेल मालकाची इज्जत वाचवण्यासाठी ५ लाख रुपयांची ‘डील’ करण्यात आली. दारव्हा उपविभागीय कार्यालयातील एक कर्मचारी आणि आर्णीतील दोन मध्यस्थांनी मध्यरात्रीपर्यंत ही समेट घडवून आणली. कायद्याचे रक्षकच जेव्हा भक्षक बनून लाखांच्या राशीवर डल्ला मारतात, तेव्हा सर्वसामान्यांनी न्याय कोणाकडे मागायचा? सदर ‘राजपूत’ हॉटेलचा मालक हरी ओमसिंग बघेल हा एका नामांकित दैनिकाचा शहर प्रतिनिधी असल्याचे बोलले जात आहे. लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणवून घेणाऱ्या व्यवसायाचा वापर करून हा ‘गोरखधंदा’ लपवला जात होता. याच कारणामुळे आर्णी ठाणेदारांनी या कुंटणखान्याला आजवर अभय दिले होते का? अशी शंका आता जनमानसात उपस्थित होत आहे.
या गंभीर प्रकरणावर आर्णीचे ठाणेदार निलेश सुरडकर यांनी दिलेली प्रतिक्रिया म्हणजे ‘रोगापेक्षा उपाय भयंकर’ अशी आहे. “एका अत्याचाराच्या प्रकरणाच्या तपासासाठी फॉरेन्सिक टीम तिथे गेली होती,” असे सांगून त्यांनी प्रकरणावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र, तपासासाठी गेलेले पथक २२ जोडप्यांना सोडून ५ लाखांची चर्चा का करत होते? याचे उत्तर अद्याप मिळालेले नाही.
यवतमाळचे पोलीस अधीक्षक कुमार चिंता हे एक शिस्तप्रिय अधिकारी म्हणून ओळखले जातात. त्यांच्याच बैठकीचा फायदा घेऊन खालच्या दर्जाच्या अधिकाऱ्यांनी केलेल्या या ‘माया’ गोळा करण्याच्या प्रकारामुळे पोलीस दलाची नाचक्की झाली आहे.
API पारडकर यांनी अधिकाराचा गैरवापर का केला?
कुंटणखान्यावर PITA नुसार कारवाई का टाळली गेली?
तो ५ लाखांचा व्यवहार कोणाकोणाच्या खिशात गेला?
या प्रश्नांची उत्तरे आता तपासातच समोर येतील. भ्रष्ट अधिकारी आणि अवैध धंदेवाल्यांच्या या साखळीवर पोलीस अधीक्षक काय बडगा उगारतात, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. दोषींवर कारवाई न झाल्यास पोलीस दलातील भ्रष्टाचार उघडपणे फोफावेल, अशी भीती व्यक्त होत आहे.(क्रमशः)