प्रफुल्ल व्यास अधिस्वीकृती समितीवर निवड
साहसिक न्युज24
प्रतिनिधी/ वर्धा :
वर्धा जिल्हा श्रमिक पत्रकार संघाचे सह सचिव प्रफुल्ल व्यास यांची महाराष्ट्र शासनाच्या नागपूर विभागाचे शासन नामनिर्देश सदस्य म्हणून निवड झाली.
पत्रकार व्यास यांना यापूर्वी राज्य शासनाचा महात्मा गांधी व्यसन मुक्ती विभागीय आणि अहल्या देवी होळकर जलमित्र पुरस्कार मिळाले आहे. अलीकडच्या काही वर्षात अधिस्वीकृती समितीवर वर्धा जिल्ह्याला प्रथमच संधी मिळाली आहे. व्यास यांचे खा. रामदास तडस, राज्य श्रमिक पत्रकार संघाचे मार्गदर्शक यदू जोशी, भाजपाचे जिल्हाध्यक्ष सुनील गफाट, राजेश बकाने, वर्धा श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रवीण धोपटे, जेष्ठ पत्रकार इक्राम हुसेन, अभिनय खोपडे, प्रशांत देशमुख, संजय तिगावकर, संजय ओझा, गजानन गावंडे, श्याम उपाध्याय, आनंद इंगोले, प्रवीण होणाडे, नरेंद्र देशमुख, आदींनी अभिनंदन केले.