देवळी /आगामी लोकसभा निवडणूक निवडणुकीच्या अनुषंगाने देवळी तहसील कार्यालय मध्ये क्षेत्रीय अधिकारी यांना ईव्हीएम मशीन व व्हीव्हीपॅटचे प्रशिक्षण देण्याकरिता शिबिर आयोजन करण्यात आले होते. जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी वर्धा यांच्या निर्देशानुसार वर्धा लोकसभा मतदारसंघ अंतर्गत देवळी विधानसभा मतदारसंघातील सर्व क्षेत्रीय अधिकारी यांचे आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने प्रशिक्षण घेण्यात आले. प्रशिक्षण देण्याकरिता उपजिल्हाधिकारी भूसंपादन तथा सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी प्रियंका पवार यांच्या उपस्थितीमध्ये संपूर्ण निवडणूक विषयी माहिती व प्रशिक्षण देण्यात आले यावेळी तहसीलदार देवळी दत्तात्रय जाधव यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. क्षेत्रीय अधिकारी यांना लोकसभा निवडणुकीच्या संदर्भात त्यांची जबाबदारी व भूमिका याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. क्षेत्रीय अधिकाऱ्याने विचारलेली प्रश्न शंका याबाबत निरसन करण्यात आले. त्यानंतर सर्व क्षेत्रीय अधिकाऱ्यांना ईव्हीएम मशीन व कंट्रोल युनिट, बॅलेट युनिट, तसेच व्ही.व्ही.पॅड मशीनचे भौतिक तसेच प्रत्यक्ष हाताळणी द्वारे प्रशिक्षण देण्यात आले. सर्व उपस्थित क्षेत्रीय अधिकाऱ्यांनी मतदान यंत्राबाबत पुलगाव शासकीय आयटीआय कॉलेजचे प्राचार्य व शिक्षक तलाठी यांच्याकडून मशीन मतदानाकरिता तयार करणे पासून मतदान प्रक्रिया पार पडेपर्यंत ते सखोल प्रशिक्षण घेतले यावेळी नायब तहसीलदार एस आर पवार, नायब तहसीलदार डॉ.शकुंतला पाराजे, नायब तहसीलदार प्राजक्ता बारसे, सर्व निवडणूक व तहसील विभागातील कर्मचारी यावेळी उपस्थित होते.