प्रा.किरण वैद्य यांची पत्रकार संघाचे अध्यक्षपदी निवड
साहसिक न्युज24
प्रतिनिधी/ हिंगणघाट:
येथील प्रा किरण वैद्य यांची पत्रकार संघ हिंगणघाट चे अध्यक्ष पदी निवड करण्यात आली आहे. स्थानिक पत्रकार संघाचे कार्यालयात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सर्वानुमते त्यांची निवड करण्यात आली. प्रा वैद्य यांनी या पूर्वी सुद्धा अध्यक्ष पद भूषविले असून दुसऱ्यांदा त्यांची निवड झाली आहे. निवडणूक अधिकारी म्हणून प्रा फारिश अली यांनी काम केले. त्यांचे हस्ते प्रा वैद्य यांना प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले.यावेळी मनोगत व्यक्त करताना प्रा वैद्य यांनी पत्रकारांचे न्याय व हक्का बद्दल सदैव तत्पर राहणार असल्याचे सांगून संघाचे वतीने समाजाभिमुख कार्य करणार असल्याचे सांगितले. तसेच सर्व सदस्या चे आभार मानले.निवडीबद्दल भास्कर कलोडे , प्रा संदीप रेवतकर, अड इब्राहीम बक्ष, दीपक सुखावानी,शंकर शिंदे , सुरेंद्र बोरकर, केवलदास ढाले, मलक नईम, अब्दुल रज्जाक, राजेश कोचर ,मोहम्मद रफीक, प्रदीप आर्य, मुकेश चौधरी, जगदिशप्रसाद शुक्ला, प्रदीप नागपूरकर, शुभम कोचर, रवी येनोरकर,, प्रा फारिश अली, नारायण सेवा मित्र परिवाराचे अध्यक्ष महेश अग्रवाल, सचिव पराग मुडे, बिपिन खिवसरा आदींनी अभिनंदन केले आहे.