प्रेमविवाहाने श्रीलंका आणि भारत आला जवळ फॉरेनची पाटलीन ! श्रीलंकेचं वऱ्हाड गोंदियामध्ये !
साहसिक News24 :
गोंदियात आली फॉरेनची पाटलीन! दिग्दर्शन प्रदीप गोंसाविकर यांची फॉरेनची पाटलीन हा सिनेमा आपण बघितलाच असेल, यात एक विशेष तरुणी भारतीय मुलाशी लग्न करते. गावाचा विकास घडवून आणायचे प्रयत्न करत असते. या सिनेमाला साजेल, अशी हुबेहुब प्रसंग गोंदियात घडला आहे. गोंदिया जिल्ह्याच्या दतोरा गावातील उमेश कांबळे या तरुणाने श्रीलंकेतील “रत्न मेनिके” या तरुणीशी प्रेमविवाह केला आहे. आता या जोडप्याने महाराष्ट्रात धम्माचा प्रसार- प्रचार करण्याचा निर्धार केला आहे. यात गोंदियातील तरुणाने सातासमुद्रा पार गावातील तरुणी आपल्या गावात लग्न करून, आणल्याने कुतूहलाचा विषय बनला आहे.
गोंदियाच्या दतोरा गावातील उमेश कांबळे हे रेल्वे विभागात नोकरीला असून, पेशाने शिक्षिका असलेल्या श्रीलंकेतील रत्न मेनिके या तरुणीशी २ वर्षाआधी फेसबुक वरून मैत्री झाली. त्यांचे प्रेम जुड़त २ महिन्याच्या आधीच लग्न करण्याचे ठरले. यासाठी दोघांनी आपआपल्या घरी लग्नाचा प्रस्ताव दिला आणि मग रत्न मेनिके यांनी भारतात येण्याचे ठरविले.
फळ विक्रेत्याचा मुलगा असा झाला ‘वेगवान गोलंदाज’, जाणून घ्या उमरान मलिकची कहाणी
अखेर घरच्याची सहमती मिळवत उमेश आणि रत्न मेनिके यांचा १८ एप्रिलला श्रीलंकेतील बुकामुना गावात लग्न झाले आहे. दरम्यान उमेश व रत्न मेनिके यांचे लग्न गोंदियात परतताच घरच्यांनी स्वागत समारंभ करण्याची तयारी करत उमेश आणि रत्न मेनिके यांचा स्वागत समारंभ पार पाडला. आता त्यांनी महाराष्ट्रात धम्माचा प्रचार करत जीवन जगण्याचा निर्धार केला आहे.
दूसरीकडे आपल्या गावात आणि घरात फॉरेनची मुलगी आल्याने गावकऱ्यांना आणि उमेशच्या घरच्यांना देखील आनंद झाला आहे. तर उमेश आणि मेनिके या बुद्धिष्ठ असून त्यांना महाराष्ट्रात धम्माचा प्रचार करायचा असल्याने त्यांनी रत्न मेनिकेशी लग्न करण्याचे ठरविले आहे. आता गोंदियात या फॉरेनच्या पाटलीनची चर्चा होऊ लागली आहे.