प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्त्यांमुळे हिंदू देवी देवतांच्या मुर्त्यांची विटंबना
जिल्हा प्रशासनास जाग येणार तरी कधी
प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती विक्रयांवर वर रोख कधी
जिल्हा सह महाराष्ट्रभर बाप्पांच्या आगमनाची मोठ्या प्रमाणात वाट बघून श्रद्धेने बाप्पांच्या मूर्तीची घरोघरी
स्थापना करण्यात आली दहा दिवसानंतर भक्की भावाने साश्रू नयनासह बापाणा ३० सप्टेंबर रोजी अखेरचा निरोप धाम नदी पात्रात दिला यात वर्धा कान्हापूर मोर्चापूर वाईतपूर रमणा सेवाग्राम वरूड आधी गावातून धाम नदी पात्रात बाप्पांच्या मूर्तींचे विसर्जन केले मात्र मुर्त्या प्लास्टर ऑफ पॅरिसच्या असल्याने विरघळून न गेल्याने मुर्त्या जशास तश्या पाण्यात पडून आहे त्यामुळे मुर्त्यांवर पाय पडून किंवा कचऱ्यामध्ये पडून राहत असल्याने मुर्त्यांचे मोठ्या प्रमाणात विटंबना होत असल्याचे दिसून येत आहे जिल्हा प्रशासनाकडून प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मुर्त्यांवर बंदी घालण्यात आली मात्र याकडे मूर्तिकार कमी वेळात जास्त मुर्त्या बनून चांगल्या कमाईच्या लालसेपोटी प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मुर्त्यांची बाजारात सर्रास विक्री करून नियमांची पायमल्ली करत असल्याचे दिसून येत आहे. त्या मुळे भाविकांच्या भावनेशी मूर्तिकार जाणीवपूर्वक दुर्लक्ष करून खेळ करत असल्याची ओरड नागरिक करत आहे जाणीवपूर्वक प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मुर्त्या तयार करून बाजारात विक्रीसाठी मोठ्या प्रमाणात उपलब्ध करून विक्री करत असल्याचे दिसून येत आहे याकडे जिल्हा प्रशासन कधी लक्ष घालणार अशा चर्चांना उधाण आले आहे.
नुकत्याच घरगुती बापांचे विसर्जन होऊन
हाडपक्या गणपतीचे २ ऑक्टोबर रोजी विराजमान होत आहे त्यातच १५ ऑक्टोबर रोजी दुर्गा मूर्तीची प्रतिष्ठापना होणार असून साधारण५ फुटपासून ते आठ फुटापर्यंत मुर्त्या असतात त्या मुळे कुंडात मुर्त्या विसर्जित होणे कठीण असल्याने धाम नदितच मुर्त्या विसर्जित कराव्या लागणार आहे.
मातीच्या मुर्त्या विरघळून जाते पण प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मुर्त्यांचे काय?
माती महाग असल्याने काही मूर्तिकार कमी वेळात जास्त मुर्त्या बनविण्याच्या नादात प्लास्टर ऑफ पॅरिसचा सर्रास वापर करत असल्याचे दिसून येत आहे
मुर्त्या नदी पात्रात विरघळत नसल्याने नदी पात्रात पडून राहतात त्या मुळे हिंदू दिविदेवत्यांच्या मुर्त्याची विटंबना होत आहे
या कडे स्थानिक जिल्हा प्रशासनाने लक्ष देणे गरजेचे असून
अशा मूर्ती दिसून आल्यास त्यावर तात्काळ उचित कार्यवाही करावी अशी मागणी भाविकांच्या वतीने जोर पकडू लागली आहे
प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती दिसल्यास मंडळाकडून चौकशी करून मूर्तिकारवर कारवाई होणार का? भाविकांमध्ये तीव्र रोष व्यक होत आहे.
सागर झोरे सहासिक न्यूज -24