फॅशन डिझायनिंग’ च्या प्रदर्शनीने तरूणी लघुउद्योगाकडे आकर्षित.
देवळी : एस.एस.एन.जे. महाविद्यालयातील ‘फॅशन डिझायनिंग’ विभागाने प्रा. मनिषा किटे व प्रा. स्वाती पातुरकर यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थिनींनी नविन कापड तसेच टाकाऊ कापडापासून विविध शबनम, बॅगस, फ्लॉवर पाॅट, फुले, उश्या, ड्रेस मटेरियल, सोफा कव्हर, रूखवंत साहित्य व विविध शोभिवंत वस्तू तयार करून एक प्रदर्शनी भरविली. या प्रदर्शनास महाविद्यालयातील तसेच देवळी शहरातील तरूणींनी भेट देऊन आपले करिअर ‘फॅशन डिझायनिंग’ क्षेत्रात करण्याची इच्छा व्यक्त केली.सदर प्रदर्शनीचे उदघाटन प्रभारी प्राचार्य डॉ. प्रभाकर ढाले यांनी प्रमुख अतिथी म्हणून माजी प्राध्यापिका डाॅ. कांचन किटे व प्रा. कांचन भोयर यांच्या उपस्थितीत केले. या प्रसंगी एन.सी.सी. अधिकारी कॅप्टन मोहन गुजरकर, प्रा. विवेक देशमुख, प्रा. जगदीश यावले, प्रा. धनराज मुंगल, प्रा. सुनिल राठी, प्रा. मेघा फासगे, प्रा. ममता पिलेवान यांच्यासह प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.प्राध्यापक व विद्यार्थ्यांनी भेट देऊन ‘अप्रतिम प्रदर्शनी’ म्हणून कौतुक केले. फॅशन डिझायनिंग विभागाच्या सहभागी विद्यार्थिनी व त्यांना प्रोत्साहन देणाऱ्या प्रा. स्वाती पातुरकर व प्रा. मनिषा किटे
अविनाश नागदेवे सहासिक न्यूज-24