बांधकाम गवंडी कामाच्या किचन किटचे अर्ध्या रात्री वाटप,वाटप केंद्रावर पिण्याच्या पाण्यापासून तर ईतर ही सुविधाच नाही.
देवळी /तालुक्यातील इसापूर येथे शासनाच्या योजने अंतर्गत गवंडी बांधकाम किचन किटचे कामगारांना वाटप सुरू आहे.वाटप केंद्रावर जिल्ह्यातील कामगार नोंदणी असणाऱ्यांना किचन किट घेण्याकरिता ईसापुर येथील वाटप केंद्रावर येऊन किचन किट घ्यावे लागते याकरिता होणारा त्रास सध्या चर्चेचा विषय आहे किट घेण्याकरिता आर्वी,कारंजा वर्धा, सेलू,कारंजा,अशा विविध गावातील कामगार नोंदणी असलेले महिला पुरुष या केंद्रावर येऊन दोन दोन दिवस मुक्कामी राहतात येथे दलालांचा सुळसुळाट असून दलालामार्फत लवकर किट मिळते अशी या ठिकाणी चर्चा आहे.या केंद्रावरील कामगाराशी संवाद साधला असता त्यांनी आपली व्यथा पत्रकारांसमोर बोलवून दाखविले या केंद्रावर आल्यावर किट घेण्याकरिता केंद्रप्रमुख अजय साबळे याला कागदपत्र दिल्यावर टोकन देण्यात येते याच टोकनच्या आधारे किचन किट देण्यात येते पण किचन किट घेण्याकरिता तासनतास एवढेच नव्हे तर दिवसभर तर कधी रात्रभर थांबवून किट मिळवण्याकरिता त्रास सहन करावा लागतो.येणाऱ्या किचन किट ट्रक द्वारे येथे आणण्यात येथे ट्रक आलेला नाही,दोन तासाने येते,एका तासाने येतो,व थांबावे लागेल,असे सांगण्यात येते. त्यामुळे दुरून आलेल्या कामगार महिला व पुरुषांना दिवसाची रात्र करून उपाशीपोटी थांबावे लागते,या वाटप केंद्रावर,पिण्याच्या पाण्याची सोय नाही,महिलांना प्रसाधना करिता व शौचालय करिता सुविधा नाही जेवणाची सोय नाही मुरमुरे फुटाणे चिवडा खाऊन किट घेऊन येणारा ट्रक आता येईल मग येईल या आशे पोटी रात्र जागवून काढावी लागते. होत असलेला त्रास दूर करण्याकरिता कोणताही अधिकारी फिरकून सुद्धा पाहत नाही त्यामुळे या केंद्रावर मनमानी सुरू असल्याचे दिसून येत आहे.केंद्रप्रमुखाची उडवा उडवीचे उत्तरे
केंद्रप्रमुख अजय साबळे यांना पाण्याच्या सोयीच्या संदर्भात विचारणा केली असता आमच्या पाण्याचे कॅन चोरीला गेल्याचा आव आणला व इतर सोयीच्या संदर्भात विचारणा केली असता त्यांनी पत्रकारांना उडवा उडवीचे उत्तरे देऊन त्यांनी पळ काढला.तसेच या केंद्रावर कोणीतरी महिला कर्मचारी दिसून आल्या त्यांना विचारणा केली असता त्यांनी संवाद साधण्याची टाळाटाळ केली आणि गाडीमध्ये बसून काढता पाय घेतला.या केंद्रावर उपस्थितांना विचारणा केली असता यांनी आपली आपबीती सांगितली की या ठिकाणी अतिशय गैरसोय होत आहे.रात्री बे रात्री किटचे वाटप करत आहे,पिण्याच्या पाण्याची सोय नाही आहे, या सर्व प्रकरणी चौकशी करण्यात यावी आणि इथे होत असलेला त्रास दूर करावा अशी मागणी यावेळी उपस्थित महिला पुरुषांनी बोलून दाखवले.