बाभूळगावात शेतकरी आत्महत्याचे सत्र सूरू,शेतकरी पूत्राने घेतला गळफास….

0

    मृतक शेतकरी पुत्र अंकुश भुसे 

भिडी / देवळी तालूक्यातील बाभूळगाव (खोसे) येथे शेतकरी आत्महत्याचे सत्रच सूरू असल्याचे दिसून येत असल्याने गावात या तरूण शेतक-्यांच्या आत्महत्या मूळे सूकसूकआट पसरला आहे.
पंधरा दिवसा अगोदर कर्जाच्या ओझ्याने त्रस्त झालेल्या शेतक-याने शेतात जाऊन झाडाला गळफास लावून आपली जिवन यात्रा संपविली होती त्याची शाई सूकते की नाही तेच कर्जाच्या विवेचणेत राहत असलेल्या शेतक-्यांच्या तरूण मूलाने स्वतःच्याच घरी गळफास घेऊन आपली जिवन यात्रा संपविली.
बाभूळगाव (खोसे) येथिल शेतकरी सूधिर भूसे यांचे कडे अडीच एक्कर शेती आहे शेतात या वर्षाला कापूस या पिकांची लागवड केली कापूस या पिकांचे उत्पन्न अतीअंल्प झाले पिकांचे किडीने उध्वस्त केले यातच डोक्यावर असलेला कर्जाचा डोंगर व मूलींचे लग्न कसे करावे या विवंचनेत ते व त्यांचा मूलगा राहत होते यातच २३ फेब्रुवारी ला रात्री जेवून करून मूलगा अंकूश भूसे वय २८ वर्ष व वडील सूधिर,यांच्या मंध्ये पिक झाले नाही कर्ज कसे फेडायचे सामोरं मूलींचे लग्न कसे करावे या बाबत चर्चा झाली व मूलगा अंकूश हा याच विवंचनेत राहत होता त्यात वडीलांनी केलेल्या चर्चेने आखरी २३ तारखेच्या रात्री वडीलांना झोपल्यावर घरीच फासी घेवून अंकूश ने जिवन यात्रा संपविली पूढील तपास देवळी पौलीस करीत आहे.

राजू वाटाणे साहसिक न्यूज /24 भिडी 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!