बाल व्यक्तित्व विकास शिबिराचे उद्घाटन संपन्न…

0

सेलू / बुधवार दिनांक 1 मे 2024 पासून ब्रह्माकुमारी सेलू येथील शिवशक्ती भवन भगत ले-आउट येथे बाल व्यक्तित्व विकास व संस्कार शिबिरास प्रारंभ झाला.
या कार्यक्रमाचे उद्घाटक दीपचंद चौधरी विद्यालयाचे मुख्याध्यापक चांदेकर सर व स्कॉलर अकॅडमी चे संचालक उकेश चंदनखेडे सर होते.ब्रह्मकुमारी सेलूच्या संचालिका दर्शना दीदी व उद्घाटक यांनी सरस्वतीचे प्रतिमेचे पूजन हारापर्ण व दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाचे उद्घाटन केले.
या शिबिरास दीपचंद चौधरी विद्यालय, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सेलू तसेच परिसरातील इतर शाळा कॉन्व्हेंट चे विद्यार्थी उपस्थित होते चांदेकर सर यांनी मेडिटेशन व सकारात्मक चिंतनाचा विद्यार्थी जीवनात काय महत्त्व आहे हे समजावून सांगितले. चांदनखेडे सरांनी भारतीय संस्कृती रूढीपरंपरेची ओळख व संस्काराची मूल्यांमध्ये लहानपणापासून रुजवण अशा शिबिरातून व्हावे असे विचार प्रगट केले.ब्रह्माकुमारीज् सेलूच्या संचालिका दर्शना दीदी यांनी विद्यार्थ्यांच्या जीवनात प्रथम आई-वडील शिक्षक समाज व अनेक संस्थांनी दिलेले चांगले विचार व संस्कारांनी दिलेले मूल्य शिकवणीतून उत्तम माणूस घडतो असे विचार प्रस्तुत केले .याप्रसंगी कुमारी पल्लवी सातपुते हिने सुंदर नृत्य प्रस्तुती देऊन पाहुण्यांचे व चिमुकल्यांचे स्वागत केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ब्रह्माकुमारी वैष्णवी दीदी यांनी केले व कार्यक्रमाचे यशस्वीते करिता विद्यालयाच्या सदस्यांनी योगदान दिले.

चैताली गोमासे साहसिक न्यूज /24 सेलू 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!