वर्धा /क्रांतीवीर स्व. महादेवराव ठाकरे सोशल असोसिएशन वर्धा द्वारा संचालित इंदिरा गांधी व्यसनमुक्ती उपचार व पुनर्वसन केंद्र वर्धा येथे महारष्ट्र दीन व कामगार दीन साजरा करण्यात आला.कार्यक्रमाला उपस्थित मान्यवर प्रमुख पाहुणे केंद्राचे प्रकल्प संचालक रमेश मोहदुरे तर अध्यक्ष स्थानी डाक्टर जयंत गांडोळे सर उपस्थित होते.प्रथम मान्यवरांच्या हस्ते द्वीप प्रज्वलित करून पूजन व हार अर्पण करण्यात आले.त्यानंतर राष्ट्रगीत घेण्यात आले.त्यानंतर प्रमुख पाहुणे म्हणून केंद्राचे प्रकल्प संचालक रमेश मोहदूरे यांनी महाराष्ट्र व कामगार दीन का साजरा केला जातो तो केव्हापासून अस्तित्वात आला त्याचे महत्व पटवून दीले. व व्यसनाचे दुष्परिणाम बाबत माहिती दिली . त्यानंतर केंद्रातील रुग्णांनी आपापले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे संचालन केंद्राच्या समुपदेसिका सारिका देशपांडे यांनी केले. तर आभार प्रदर्शन रेश्मा बोभा टे यांनी केले.कार्यक्रम यशस्वीतेसाठी शितल पुंड,सचिन हिवरे, जगदीश कूमरे, महेन्द्र पंध्रे, अनिल उईकें, प्रभा मांढरे, किरण देशमुख तसेच केंद्रातील रुग्णांनी सहकार्य केले.