बिग ब्रेकींग : भर चौकात खडसे समर्थकाला महिलांनी दिला चोप
बिग ब्रेकींग : भर चौकात खडसे समर्थकाला महिलांनी दिला चोप
By साहसिक न्युज 24
मुक्ताईनगर/ पंकज तायडे :
सोशल मिडीयात बदमनामीकारक पोस्ट व्हायरल करणाऱ्या खडसे समर्थकाला मुक्ताईनगरातील भर चौकात दोन महिलांनी चांगलाच चोप दिला आहे. या घटनेमुळे मुक्ताईनगरात खळबळ उडाली आहे.
यासंदर्भात असे की, मुलीचे सहलीला गेल्याचे फोटो चुकीचा संदर्भ घेवून सोशल मीडियात व्हायरल केल्याच्या संतापातून नगरसेविका पुत्र तथा खडसे समर्थक असलेल्या तरूणाला मुक्ताईनगरातील भर चौकात दोन महिलांनी चांगलाच चोप दिला आहे. मारहाण करणाऱ्या दोन्ही महिला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षा कार्यकर्त्या असल्याचे कळते.
आज मुक्ताईनगरात नगराध्यक्षपदासाठी निवड होती. मात्र न्यायालयाच्या निर्देशानुसार निवडणूक प्रक्रिया स्थगित करण्यात आल्याने राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली असतांना खडसे समर्थक नगरसेविका पुत्राला मारहाण झाल्याने राजकीय क्षेत्रातआता विविध चर्चा रंगल्या जात आहे.