बिबट्याने पाडला बकऱ्यांचा फडशा.
कारंजा तालुक्यातील मेठहिरजी गावात असलेल्या गोठ्यात बांधून आलेल्या शेळ्यांवर पट्टेदार वाघाने हल्ला करून तीन बकऱ्यांना गतप्राण केले. येथील रामजी भलावी यांच्या घरी गोठ्यात बांधून असलेल्या तीन बकऱ्यांना 31 मंगळवार ला पहाटेच्या सुमारास बिबट्याने हल्ला चढवत ठार केले यात या गरीब व्यक्तीच्या तीन बकऱ्या ठार झाल्याने त्याच्यावर आर्थिक अडचण ओढवले आहे या घटनेमुळे गावामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या घटनेची नोंद वन विभागाने घेतली आहे. वनरक्षक एस एस सिद्दिकी यांनी घटनास्थळी भेट देत पंचनामा केला, मात्र,नुकसानग्रस्त शेळीपालकाला शासकीय मदत देण्यात यावी, अशी मागणी आहे. या घटना शनिवारी पहाटे घडली असून सदर घटनेमुळे ग्रामस्थांमध्ये वाघाची दहशत निर्माण झाली आहे.प्राप्त माहितीनुसार, येथील बरेच शेतकरी यांनी शेतीला पुरक व्यवसाय म्हणून गोपालन, शेळीपालनाची जोड दिली आहे. या परिसरात शेती गोपालन हा व्यवसाय प्रामुख्याने केला जातो . येथील नागरिकांनी बरेचदा मंत्र्यांना मंत्री महोदयांना या गावात वन्य प्राण्यांचा त्रास असल्यामुळे स्थलांतरित करण्याबाबत बरेचसे निवेदनही दिले आहेत हा परिसर जंगलमय असून वन्यप्राणी जास्त प्रमाणात आढळून येत असते हे मात्र विशेष
गजेंद्र डोंगरे सहासिक न्यूज-24