बुद्ध मूर्तीची प्रतिष्ठापना व बुद्ध विहाराचे अनावरण सोहळा संपन्न.
🔥 लोकवर्गणीतून भव्यदिव्य बुद्ध विहाराचे बांधकाम
सिंदी (रेल्वे) : नवंबौद्ध विकास पळसगांव (बाई) व प्रजापती महामाया महिला मंडळ पळसगांव (बाई) यांच्या लोकवर्गणीतून शाक्य मुनी बुद्धविहार लोकार्पण समारंभ तसेच थायलंड वरून दानप्राप्त तथागत भगवान गौतम बुद्ध मूर्तीचे प्रतिष्ठापना सोहळा भदंत बोधिरत्न महाथेरो यांच्याहस्ते पळसगाव (बाई) येथे रविवारी 29 ऑक्टोबर रोजी संपन्न झाला. याप्रसंगी कार्यक्रमाचे उद्घाटक भदंत एण बोधिरत्न महाथेरो, कार्यक्रमाचे अध्यक्ष आयष्यमती वनिता कुत्तरमारे, प्रमुख अतिथी म्हणून अविनाश पाटील, दिनेश पाटील, निमाने सर, सुपदम धम्मचारी, नरेंद्र सोनारकर स्मिता हाडके, शारदा बोरकुटे उपसरपंच पळसगाव (बाई) आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती.
सामाजिक व सांस्कृतिक विकास मंचाच्या बौद्ध बांधवांनी प्रबुद्ध विहाराच्या बांधकामासाठी कोणताही आमदार, खासदार किंवा इतर कोणत्याही निधीची अपेक्षा न करता स्वतः बौध्द बांधवांनी स्वखर्चातून विहाराचे बांधकाम पूर्ण करून भव्य सोहळा आयोजन केल्याने बौध्द बांधव धनीवादास पात्र आहेत. तसेच केवळ विहार चालणार नाही. त्यात रोज सकाळी व संध्याकाळी वंदना घेण्यात यावी व विहार बंद ठेऊ नये. स्वछ मनाने आणि डोळस पणाने संवाद साधून त्याठिकाणी अभ्याशिका, वाचनालय काढून होतकरू विद्यार्थ्यांना ध्यानाचे धडे शिक्षणासाठी उघडावी. तसेच गोरगरीब विद्यार्थांना शिक्षणासाठी मदत करावी अशा प्रकारे मोलाचे मार्गदर्शन कार्यक्रमाचे उद्घाटक भदंत बोधिरत्न महाथेरो यांनी केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अमोल कांबळे यांनी केले तर आभार सतिश भगत यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी निळूपाल पाटील, प्रकाश खडतकर, राहुल पाटील, चंद्रशेखर कुंभारे, आशिष ठमके, सुमित खडतकर, स्वप्निल थूल, अमरदीप मून, भाऊराव थूल, निखिल वाघमारे, दिनेश ठमके, रुपेश मून, प्रशांत खडतकर, प्रशिल वाघमारे, अमित पाटील, मंजुषा ठमके, पायल खडतकर, हर्षा खडतकर, अर्चना पाटील, मिना ठमके, गौतम पाटील, माधुरी कुंभारे आदींनी अथक परिश्रम घेतले.
दिनेश घोडमारे सहासिक न्यूज -24 सिंदी रेल्वे