बुलढाणा अर्बन बँकेवर आयकर विभागाची धाड ५३ कोटीच्या ठेवीत जप्त: ग्राहकांत हडकंप
बुलढाणा/ शहर प्रतिनिधी:
बुलढाणा अर्बन क्रेडिट को-ऑपरेटिव्ह बँकेच्या बुलढाणा शहरातील मुख्यालयातील मुख्य शाखेवर दिनांक २७ ऑक्टोंबर २०२१ रोजी केंद्रीय प्राप्तिकर खात्याने धाड टाकून अवैद्य मार्गांनी जमा केलेले ५३ कोटी रुपये जप्त केले आहे. यामुळे बुलढाणा बँकेच्या ठेवीदारां मध्ये भिती निर्माण झाली असून दैनिक लोकमत व दैनिक नवभारत या वृत्तपत्रात वृत्त प्रकाशित होताच अनेकांनी आपल्या जमा ठेवी विड्रॉल केल्या आहे. याबाबत वृत्तसंस्थे मार्फत मिळालेल्या वृत्तानुसार दिनांक २७ ऑक्टोंबर २०२१ रोजी नवी दिल्ली येथील प्राप्तीकर विभागाची टीम थेट बुलढाणा येथील बँकेच्या मुख्यालयात गेली व बँकेचे अध्यक्ष यांच्या निवासस्थानी पोहोचली. प्राप्तीकर विभागाने केलेल्या तपासणीमध्ये बुलढाणा येथील एका व्यापाऱ्याने आपला काळा पैसा पांढरा करण्यासाठी बुलढाणा बँकेची साथ घेतली. बेनामी नावानी तब्बल एक नव्हे, दोन नव्हे तर चक्क बाराशे खाती आधारकार्ड, पॅनकार्ड न घेता उघडण्यात आली व या खात्यांवर चक्क ऑगस्ट २०२० ते मे २०२१ या कालावधीमध्ये ५३ कोटी ७२ लाख रुपयांचा व्यवहार केला. बाराशे खात्यापैकी सातशे खाते एकाच नंबरचे आहे खाते उघडल्यानंतर अवघ्या सात दिवसात ३४ कोटी १० लाख रुपये बेनामी असलेल्या संबंधित खात्यात जमा करण्यात आले. ही बाब आयकर विभाग दिल्ली यांना माहित पडली. त्याच अनुषंगाने प्रथमच बुलढाणा बँकेवर धाड टाकण्यात आली. प्राप्तीकर विभागाने केलेल्या चौकशीत बँकेच्या कारभारात प्रचंड अनियमितता आढळून आली आहे तसेच केवायसी कागदपत्राची पूर्तता केल्याशिवाय खाते उघडता येत नसताना बँकेचे अध्यक्ष डॉक्टर सुकेश झंवर यांनी धान्य व्यापारी यांच्याशी हातमिळवणी करून १२०० बेनामी खाते काढले असल्याचा सबळ पुरावा आयकर विभागाच्या हाती लागला आहे. केंद्रीय प्राप्तिकर मंडळानी दिलेल्या माहितीनुसार या शाखेत बाराशे हून अधिक नवीन बँक खाती पॅनकार्ड, आधारकार्ड माहिती शिवाय उघडण्यात आली. केवायसी नियमाची ऐसीतैसी करत खाती उघडण्यात आल्याचे तपासात समोर आले आहे. खाते उघडण्याचे सर्व अर्ज बँकेच्या कर्मचाऱ्यांनी भरले आहेत. पारदर्शक कारभाराचा डिंडोरा पिटविणार्या डॉक्टर सुकेश झंवर व शाखा व्यवस्थापक यांना आयकर विभागाला १२०० बेनामी खात्याची माहिती देता आली नाही. परंतु कोट्याधीश धान्य व्यापारी चा काळा पैसा पांढरा करण्याचा चक्कर मध्ये बुलढाणा बँकेने घातक पाऊल उचलले आहे. ५३ कोटीच्या ठेवीत जप्त होताच ज्या लोकांनी या बँकेत मुदत ठेवी ठेवल्या त्या ग्राहकांना आपला पैसा सुरक्षित आहे किंवा नाही याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. ५३ कोटी ७२ लाख रूपये जप्त होतात विदर्भातील अनेक ग्राहकांनी आपल्या ठेवी काढण्यास सुरुवात केली आहे. ३५० च्या वर शाखेचा प्रचंड विस्तार असलेल्या बुलढाणा बँकेवर केंद्रीय कर विभागाने करडी नजर टाकली आहे भविष्यात आयकर विभागाने चौकशी केल्यास आपला पैसा तर डुबला नाही ना ! ही भीती ग्राहकांना सतावीत आहे.
क्रमश: