बोरखेडी शेतशिवारात वीज पडून एका बैलाचा मृत्यू

0

By साहसिक न्युज 24
मदनी (आमगाव)/ गजेंद्र डोंगरे: परिसरामध्ये गेल्या तीन-चार दिवसांपासून ढगाळ वातावरण, वादळ वारा सह तुरळक पाऊस दिसून येत होता. मात्र आज शुक्रवारला दुपारच्या वेळी अचानक वादळी वाऱ्यासह पावसाला सुरुवात झाली अशातच विजेच्या कडकडाटासह नजीकच्या बोरखडी शिवारात अरविंद डांगे यांची बैल जोडी शेतात काम आटोपून पळसाच्या झाडाखाली बांधून असताना अचानक वीज कोसळून एका बैलाचा मृत्यू झाला .
याबाबत श्री डांगे शेतकरी यांच्या माहितीनुसार शुक्रवार ला दुपारच्या सुमारास अचानक परिसरात ढगाळ वातावरण तयार झाले. वादळी वारे वाहू लागले. विजेच्या कडकडाटासह जोरदार पाऊस झाला. अशातच यथे अवकाळी पाऊसात विज पडून अरविंद डांगे शेतकरी याचे शेतात वीज पडून एक बैल दगावला आहे.गेल्या तीन चार दिवसांपासून परिसरात ढगाळ वातावरण निर्माण होत होते. वादळी वाऱ्यासह विजेच्या कडकडाटासह पाऊस झाल्याने शेतकरी धास्तावला आहे. मात्र, हतबल शेतकरी झाला असून यात मोठे नुकसान झाले असल्याचे दिसून येते. शेतीसाठी बैलजोडी असणे अत्यंत महत्त्वाचे असते मात्र, अजूनही वातावरण किती दिवस राहणार व बेमोसमी पाऊस किती पडणार याची चिंता शेतकऱ्यांना लागली आहे. अगोदरच सततची नापिकीचे संकट असतानाच बेमोसमी पावसाचे संकटामुळे बैल दगावला असून पुढील शेती कशी करायची हा प्रश्न निर्माण झाला आहे. बैल जोडी यांच्या किमतीत कमालीची वाढ झाली असल्याने नवीन आव्हाने निर्माण झाले आहे.  शासनाकडून आर्थिक मदत मिळावी अशी मागणी शेतकरी अरविंद डांगे करीत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!