भव्य शेतकरी मोर्चा! चलो जिल्हाधिकारी कार्यालय वर्धा! बळीराजा घे उभारी!
सोयाबीन पिकाची दुर्दशा बघतांनी शेतकरी मेटाकुटीला आला.हातातोंडाशी आलेला घास ऐनवेळी निसर्गाने अतिवृष्टीने हिसकावुन नेल्याची भावना प्रत्येक शेतकर्यांचा झालेली आहे.आर्थिक डोलारा सांभाळतानी अक्षरशः तारेवरची कसरत करावयाची वेळ त्यांच्यावर आलेली आहे.अशा अस्मानी संकटाच्या वेळी त्याला नैतिक आधार देण्यासाठी त्याची बाजु सरकार दरबारी मांडण्यासाठी वर्धा जिल्ह्यातील सर्व राजकीय पक्ष एकवटले.सरकार दरबारी शेतकर्यांची बाजु मांडण्यासाठी भव्य शेतकरी मोर्चा दिनांक 5 ऑक्टोबरला जिल्हाधिकारी कार्यालयावर नेण्यासाठी पुर्वनियोजन बैठक शासकीय विश्रामगृह वर्धा येथे आयोजित केली होती.राष्ट्रवादी काॅंग्रेसचे अध्यक्ष सुनिल राऊत,माजी आमदार राजु तिमांडे, धनराज तेलंग,मुन्ना झाडे, संदिप भांडवलकर,सचिन ठाकरे,प्रणय कदम,आकाश दाते,काॅंग्रेसचे माजी नगराध्यक्ष शेखर शेंडे,सुधीर पांगुळ,बाळा माऊसकर,सागर सुरेश सबाने,शिवसेनेचे श्रीकांत मिरापुरकर,देवतारे भाऊ, शार्दुल वांदिले, आप पक्षाचे प्रमोद भोमले,किसान अधिकार अभियानचे अविनाश काकडे,सुदाम पवार,बी.आर.एस.पक्षाचे पवन तिजारे ,महाराष्ट्र कृषक समाजाचे संजय काकडे, शामराव कोरडे,सुरेश पोटदुखे,सुरेश मेहर,विदर्भ राज्य आघाडीचे अरुण गावंडे, आदिवासी विकास परिषदेचे चंद्रशेखर मडावी,अजय घंगारे,नंदु मुन, संदिप सावरकर,योगेश ठोसर,आलोडी निवारण समितीचे नत्थु पाटील,गौरव गोमासे,प्रज्वल वाटकर,गिरीष केळापुरे,प्रशांत देशमुख हजर होते.
शेतकरी मोर्चा बजाज चौक वर्धा येथुन दुपारी 12 वाजता निघुन जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकेल.
सरकार दरबारी माडांवयाचे मुद्दे.
1) सोयाबीन, कपाशी,तुर व भाजीपाला सर्वच पिके अतिवृष्टीने हातची गेल्यामुळे शेतकर्याला हेक्टरी 50 हजारांची शासकीय मदत देण्यात यावी.
2) कुचकामी पिक विमा योजना रद्द करुन शेतकरी सानुग्रह योजना चालु करा.
3) 20 पेक्षा कमी पटसंख्याच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा बंद करण्याबाबतचा निर्णय रद्द करणे.
4) स्थानिक स्वराज्य संस्थांच्या 62 हजार शाळा कार्पोरेट सेक्टरच्या कंपन्यांना दत्तक देण्याचा निर्णय रद्द करणे.
5) शासन सेवेतील 85 संवर्गाची भरती प्रक्रिया 9 कंपन्यांना देऊन कंत्राटी पद्धतीने भरती करण्याचा निर्णय रद्द करणे.
हे मुद्दे मांडून शेतकर्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक देण्यासाठी शेतकरी मोर्चात भाग घेऊन आंदोलन यशस्वी करावे असे आवाहन करुन बैठक समाप्त झाली.
आणखी काही मुद्दे शेतकर्यांना सुचवायचे असल्यास प्रतिक्रिया द्वारे कळवावे.
अविनाश नागदेवे सहासिक न्यूज -24