भाजपाच्या प्रवक्त्या नुपुर शर्मा त्यांच्यावर कारवाई करा; हिंगणघाट येथील मुस्लिम बांधवांची मागणी
By साहसिक न्युज 24
प्रतिनिधी /हिंगणघाट:
भाजपाच्या राष्ट्रीय प्रवक्त्या नुपूर शर्मा आणि भाजपचे आय टी प्रमुख नवीन कुमार जिंदाल यांनी मोहम्मद साहब सल्लल्लाहु अलैहे वसल्लम यांच्या गौरवाचा अपमान करून जगभरातील मुस्लिमांच्या श्रद्धेला ठेच पोहोचवण्याचे घृणास्पद काम केले आहे. आमचे प्रेषित मोहम्मद आमच्यावर अधिक प्रेम करतात, आणि त्यामुळे कोट्यवधी मुस्लिमांच्या भावनांशी खेळण्याचा प्रकार केला जात आहे, देशाची एकता आणि अखंडता बिघडवणाऱ्यांना कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे, याकरिता हिंगणघाट येथील मुस्लिम समुदायाच्या वतीने हिंगणघाट तहसीलदार व ठाणेदार यांना निवेदन देण्यात आले आहे. दोषींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली आहे.