भाजपा मच्छिमार आघाडीच्या जिल्हाध्यक्षपदी पंकज बावणे.
सिंदी (रेल्वे) : येथील अतिशय सय्यमी स्वभावाचे पंकज बावणे यांची भारतीय जनता पार्टी जिल्हाध्यक्ष सुनील गफाट यांनी भाजपा मच्छिमार सेल संयोजक वर्धा जिल्हाध्यक्षपदी नुकतीच एका पत्रकाद्वारे नियुक्ती करण्यात आली आहे.
सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर पंकज बावणे हे शिक्षित असून मच्छिमारांच्या सर्वच प्रश्नांची जाण असणारे अत्यंत प्रभावी संभाषण कौशल्य आणि क्रियाशील कार्यकर्ते आहेत. समाजाच्या न्याय हक्कासाठी न्याय प्राप्तीच्या लढ्याला, सामाजिक चळवळीला गतिमानता लाभावी, कुशल नेतृत्व व संघटन कौशल्याचा मच्छिमार संघटनेच्या माध्यमातून समाज हितास्तव भरभक्कम कौतुकास्पद उज्वल कार्य घडून येण्यासाठी कार्यकर्तृत्वास पंकज बावणे यांना भारतीय जनता पार्टी जिल्हाध्यक्ष सुनील गफाट यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.
जिल्ह्यातील मच्छिमारांना न्याय देण्याचे काम करत राहू तसेच रोजगार, शिक्षण लोकसेवेची कामे तथा शासनाच्या योजना लोकांपर्यंत नेण्याचे आस्वासन पंकज बावणे यांनी दिले. त्यांच्या या नियुक्ती बद्दल भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, खासदार रामदास तडस, आमदार समीर कुणावार, मच्छिमार आघाडीचे चेतन पाटील आदींचे पंकज बावणे यांनी आभार मानले आहे.
बावणे यांची मच्छिमार सेल संयोजकपदी नियुक्ती झाल्याबद्दल प्रशांत कोल्हे, पवन बावणे, अमोल गवळी आदींनी अभिनंदन केले आहे.
दिनेश घोडमारे सहासिक न्यूज-24