भारत जोडो अभियान तर्फे रविवार 18 फेब्रुवारी 2024 ला महात्मा लॉन गोपुरी, वर्धा येथे जिल्हास्तरीय वर्धेत ओबिसी हक्क सभेचे आयोजन..

0

मंडल-कमंडल,ओबिसी जात जनगणना,ओबिसी अधिनियम दुरुस्ती , ओबिसींचे उच्चाटन,संविधानातील तरतूदी, युवक विद्यार्थी महिला व शेतकरी प्रश्नावर होणार चर्चा.

 वर्धा /..महाराष्ट्रात ओबिसी प्रवर्गात 360 जातीतील समाज सहभागी आहे. राज्य व केंद्र सरकारने मागील अनेक वर्ष ओबिसी समाजाची दिशाभुल करून न्याय्य हक्कांशी खेळ केला आहे. मुख्य प्रश्नावरून ध्यान भटकवण्याचा सतत प्रयत्न केला आहे. दोन समाजात , दोन प्रवर्गात भांडण जुंपवण्याचा प्रयत्न केला जात आहे. यात मोठ्या समाजातील नागरीकांची पिछेहाट होते आहे. या सर्व मुद्दयावर लक्ष केंद्रीत करून *एक एक जातींच्या संघटना नाही तर प्रवर्गातील नागरीकांची सामुहीक संघटना मजबुत करण्यासाठी या एक दिवसीय ओबिसी हक्क मेळाव्यात चर्चा व मार्गदर्शन होणार आहे .

ओबिसी हक्क सभा
रविवार दिनांक 18 फेब्रूवारी 2024
वेळ सकाळी 11 वाजता ते दुपारी 3.00 वाजता पर्यत
स्थान : महात्मा लॉन, गोपुरीच्या बाजूला ,नागपूर रोड,नालवाडी वर्धा

एक दिवसीय ओबिसी हक्क सभा कार्यक्रमात चर्चचे विषय;

1) मंडल ते कमंडल ओबीसींच्या हक्कांशी होत असलेला खेळ.2) वर्णवादी उच्चवर्णीयांद्वारे ओबीसी नेत्यांचे उच्चाटन3) ओबीसी विद्यार्थी हक्कांचे उच्चाटण ( 2014 ते 2024 चे upsc विद्यार्थी 4) शेतकरी शेतमजूर कामगार वर्गाच्या आवश्यक आर्थिक सामाजिक प्रश्नांकडे दुर्लक्ष5) उच्चवर्णीयांचे आरक्षण व व्यवस्थेवरील घट्ट कब्जा6) सरकारकडून ओबीसी प्रवर्गाचे मोठ्या प्रमाणात झालेले खच्चीकरण7) भारत जोडो न्याय यात्रेत न्यायाची भुमिका8) ओबिसी जात जनगणना, विद्यार्थ्यांना शैक्षणिक , आर्थिक , प्रशासन व शासनातील न्यायासाठी ओबीसींची एकजुटता.या एक दिवसीय ओबिसी हक्क स़भेत जिल्ह्यातील सामाजिक राजकीय शैक्षणिक सांस्कृतिक क्षेत्रात कार्यरत नेते कार्यकर्ते व समाजातील प्रतिनिधि सहभागी होणार आहे.या कार्यक्रमाची पूर्वतयारी झालेली असून सर्व मान्यवरांशी संपर्क करण्यात आला आहे. ओबिसी समाजातील प्रतिनिधि व कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात या सहभागी व्हावे असे आवाहन आयोजन समिती तर्फे करण्यात आले आहे.

विनित

तूषार पेंढारकर,नितीन झाडे,सागर सबाने, प्रफुल गुल्हाने, डॉ विनय मुन, विनय डहाके, गोपाल दुधाने, ज्योती पासवान, संदिप किटे, अभिजित डाखोरे, रविंद्र लांबट, चंद्रशेखर दुर्गे, चंद्रशेखर मडावी, मनिष साहू, अविनाश सेलूकर, मनोज तायडे, अर्चना भोमले, द्वारका इमडवार, सुदाम पवार, चंदु ढगे, सुरेशजी बोरकर, स्टीवन भाई, मजीदभाई कुरैसी, प्रफुल कुकडे, बंटी खडसे, सुधाकरराव मेहेरे, पुरुषोत्तम खासबागे, प्रविण कात्रे, संजय काकडे, सुनिता अलोने, शारदा रोकडे, प्रविण पेठे, विठ्ठल झाडे.

गजेंद्र डोंगरे साहसिक न्यूज/24 वर्धा 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!