भिष्णुर येथील अल्पभूधारक शेतकऱ्याच्या मृत्यूस जबाबदार कोण….?

0

मृतक राजेश नांदणे शेताच्या धुऱ्यावर करंट लागून शेतकरी जागीच ठार भिष्णुर येथील घटना. (२)एकर शेतीत शेतकऱ्याने पेरली होती कपाशी व सोयाबीन.

आष्टी शहीद -/ तळेगांव नजीकच्या भिष्णुर येथे एका शेतकऱ्याचा विजेच्या धक्क्याने दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली असुन या घटनेमुळे सगळीकडे हळहळ व्यक्त होत आहे.राजेश नांदने यांच्याकडे २ एकर जमिनीचा तुकडा असून त्याच्यावर पीक घेऊन ते आपल्या परिवाराचा उदरनिर्वाह करत असत,यावेळी सुद्धा त्यांनी आपल्या शेतात कपाशी व सोयाबीन पेरले होते, गेल्या पाच सहा दिवसापासून पाऊस सुरु असल्याने व आज सकाळी जरा पावसाने उसंत दिल्याने राजेश नांदने हे आपल्या पत्नीसह शेतात गेले होते, शेतात काम करत असतांना शेताच्या धुऱ्यावर ते अचानक खाली पडले व हलायला लागले त्यांची ही अवस्था पाहून त्यांच्या पत्नीने जोऱ्यात हंबरडा फोडला त्यांचा आवाज ऐकून आजूबाजूचे शेतकरी तेथे आले तेव्हा त्यांना नांदने यांच्या हातात तार असल्याचे दिसले ते जोरात हलत होते व अचानक त्यांच्या अंगातून धूर निघाला आणि ते शांत झाले असे शेतकऱ्यांनी सांगितले.त्यांना विजेचा धक्का लागला हे समजल्यावर शेतकऱ्यांनी नांदने यांच्या पत्नीला बाजूला केले,पण त्या जिवाच्या आकांताने पत्नी रडत होत्या,राजेश नांदने यांच्या पश्चात एक मुलगा मुलगी पत्नी आई-वडील असून त्यांच्या अचानक जणांनी त्यांचा परिवार उघड्यावर आला आहे त्यांना तातडीने शासकीय मदत मिळावी अशी मागणी आता गावकऱ्यांच्या वतीने करण्यात येत आहे.                                                             (शेतकऱ्याला बेजबाबदारपणा कुणाचा.?)                              राजेश नांदने यांच्या शेतात असलेल्या विजेच्या खांबावरून गेलेल्या तारांना इन्सुलेटर नसल्याने जिवंत तारांचा संपर्क थेट अर्थिंग च्या ताराला आल्याने व अर्थिंगचा तार हा जमीनित असुन जमीन ओली असल्याने त्या ताराच्या संपर्कात आल्याने शेतकऱ्याला करंट लागला असावा असा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात येत असला तरी हा बेज जबाबदारपणा कुणाचा असा प्रश्न या निमित्ताने भेडसावत आहे.कुणाच्या बेरोबाबदारपणामुळे कुणाचा जीव गेला व जीव गेल्याने जो संसार उघड्यावर आला त्याला जबाबदार कोण व त्याची जबाबदारी घेणार कोण असा सुद्धा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे. सरकारी काम असो किंवा खाजगी काम ते करण्यासाठी पगारी नोकरदार वर्ग नियुक्त केलेले असतात पण हे पगारी नोकरदार वर्ग आपले काम व्यवस्थित करत नसल्याने अशा चुका घडून अनेकांचे संसार उघड्यावर येतात त्यामुळे अशा बेजबाबदार कर्मचाऱ्यांवर तातडीची कारवाई करणे गरजेचे आहे जेणेकरून भविष्यात कोणताही कर्मचारी अशी चूक पुन्हा करणार नाही व कुणाचे संसार कुणाच्या चुकीमुळे उघड्यावर येणार नाही हे मात्र तितकेच खरे.

नरेश भार्गव साहसिक news -/ आष्टी शहीद 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!