वर्धा,वायफड -/ आज दिनांक 26 जुलै 2024 ला लोकनेते,शिक्षण महर्षी, सहकार महर्षी, यशवंत ग्रामीण शिक्षण संस्थेचे संस्थापक स्व.बापूराव देशमुख उपाख्य दाआजी यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे प्रभारी मुख्याध्यापक प्रशांत वडाळकर तर प्रमुख अतिथी भुरे सर,कु. बाराहाते मॅडम व लोडे सर होते.यावेळी प्रमुख वक्त्यांनी दाआजी यांनी वर्धा जिल्ह्यातील ग्रामीण भागात शिक्षणाची गंगा पोहचविण्याचे कार्य तसेच सहकार क्षेत्रातील त्यांचे योगदान याबद्दल व त्यांच्या संपूर्ण जीवन चारित्र्यावर प्रकाश टाकला. यानंतर बाहेर गावातील विद्यार्थ्यांना शाळेतर्फे शालेय गणवेश, स्कूल बॅग व सायकल यांचे वाटप करण्यात आले. यावेळी स्मृतिदिनाचे औचित्य साधत स्व. बापूरावजी देशमुख यांच्या स्मरणार्थ शाळेत हरितासेने मार्फत वृक्षारोपण करण्यात आले. कार्यक्रमाचे संचालन कु.बोंडे मॅडम यांनी तर आभाप्रदर्शन भाकरे सर यांनी केले.या कार्यक्रमाला शाळेतील विद्यार्थी,तसेच शिक्षक तुराले सर, सोनकुसरे सर,वाघ सर,कांबळे मॅडम, भस्मे सर उपस्थित होते.