भूमी अभिलेख कार्यालयातील अनागोंदी कारभारामुळे आ. कुणावार झाले संतप्त..
थेट कार्यालयात जाऊन केली उपविभगिय अधिकाऱ्यामार्फत चौकशी..
महसूल मंत्र्यासोबत संपर्क करीत केली दोषींवर कारवाईची मागणी..
हिंगणघाट : स्थानिक उपधिक्षक भूमी अभिलेख कार्यालयातील अनागोंदी कारभारामुळे विधानसभा क्षेत्राचे आमदार समीर कुणावार संतप्त झाले असून आज त्यांनी भूमी अभिलेख उपअधीक्षक कार्यालयात जातीने भेट दिली.
येथील कार्यालयात सामान्य जनतेची कोणतीही कामे चीरीमीरी घेतल्याशिवाय होत नाही, गोरगरीब जनतेची या कार्यालयाशी संबंधीत दलाल लूट करीत असल्याची वार्ता आमदार कुणावार यांचेकडे वारंवार करण्यात आली, जनतेच्या तक्रारीची दखल घेत आमदार कुणावार यांनी थेट कार्यालयात धडक दिली.
येथील कार्यालयातील प्रभारी उपअधीक्षक सुनील बन यांचेसमोरच खुद्द आमदार कुणावार यांनीच तक्रारीचा पाढा वाचला, येथील कर्मचारी श्री येते यांच्या कामकाजाविषयी उपस्थित पत्रकार तसेच नागरिकांनी मोठ्या तक्रारी नोंदविल्या.
त्यांनी यावेळी उपविभागीय अधिकारी शिल्पा सोनाले, परिविक्षाधीन उपविभागीय अधिकारी विरेंद्र जाधव, तहसीलदार सतिश मासाळ यांना भूमिलेख कार्यालयाच्या भोंगळ कारभाराची चौकशी करण्याचे निर्देश देत या भ्रष्टाचाराविरोधात थेट महसूलमंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांना माहिती दिली.
उप अधिक्षक दोषी अधिकारी व कर्मचाऱ्यांची उपसंचालक भूमी अभिलेख यांचे मार्फत सखोल चौकशी करून कारवाईची मागणी केली.
मंत्रीमहोदयांनीसुद्धा आ. कुणावार यांच्या मागणीची दखल घेऊन उच्चपातळीवरून चौकशी करण्याचे आदेश दिले.
ईकबाल पहेलवान सहासिक न्यूज -24हिंगणघाट