मदना गावात मोफत आरोग्य शिबीर व कोरोना लसीकरण संपन्न
Byसाहसिक न्युज 24
गजेंद्र डोंगरे/ मदनी (आमगाव):
वर्धा येथील रामकृष्ण बजाज कृषी महाविद्यालय येथील चौथ्या वर्षातील विद्यार्थ्यानी ग्रामीण कृषि कार्यानुभव कार्यक्रमा अंतर्गत मदना गावात सकाळी ०९ वाजे पासून दुपारी ०३ वाजे पर्यंत मोफत आरोग्य तपासणी व कोरोना लसीकरण शिबिर आयोजित करण्यात आले होते.
या शिबिरात रक्तदाब, सुगर , रक्त तपासणी व इतर सामान्य आरोग्य तपासणी मोफत करण्यात आले व कोरोना चे लसीकरण देण्यात आले.
आरोग्यवर्धीनी केंद्र , खरांगणा येथील डॉ चैताली चांदेकर , शुभांगी गळवे , आरोग्य सेविका दुर्गा मंधार , आरोग्य सेवक शुभम काळे , मनीषा वशादे , आशा वर्कर वर्षा मदनकर यांचा उपस्थितीत आयोजित या शिबिराचा १५० नागरिकांनी लाभ घेतला . या कार्यक्रमाचे आयोजन कृषी विद्यार्थी निवास बुधवत, वैभव वानखेडे , संकेत झोड , यशवंत शिंदे, सम्यक गोटे, सिद्धेश उंबरकर, पंकज तडस यांनी केले व या शिबिराला गावातील सरपंच सौ जयश्रीताई मदनकर , ग्रामसेवक श्री प्रवीण आत्राम व इतर सर्व ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते.
या कार्यक्रमाला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी के सोनटक्के , कार्यक्रम अधिकारी पी. एस. खोडके , कार्यक्रम समन्वयक वैभव गिरी व डॉ राणी काळे यांचे विशेष मार्गदर्शन लाभले.