महालक्ष्मी स्टील कंपनीवर युवा संघर्ष मोर्चाची धडक…
● स्थानिकांचे रोजगार व
जिवघेण्या प्रदूषणाबद्दल दिले निवेदन.हिच ती महालक्ष्मी कंपनी प्रदूषणामुळे नागरिक त्रस्त आहे.देवळी : स्थानिक MIDC मध्ये SMW इस्पात ( पूर्वीची महालक्ष्मी स्टील कंपनी ) नावाची लोखंड बनवणारी कंपनी असून गेल्या बारा वर्षांपासून या कंपनीद्वारे होत असलेल्या जीवघेण्या प्रदूषणामुळे देवळीकर नागरिक त्रस्त आहेत. वारंवार तक्रारी करूनही कंपनी प्रशासन या गंभीर बाबीकडे दुर्लक्ष करीत असल्याची नागरिकांची ओरड आहे.या प्रदूषणामुळे लहान मुले व वयोवृद्ध नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत असून देवळीमध्ये दमा, अस्थमा, डोळ्यांचे आजार व त्वचारोग सारखे रोगांच्या प्रमाणात मोठी वाढ झाली असून नागरिक या प्रकारामुळे हैराण आहे. तसेच या प्रदूषणाचा शेती उत्पन्नावर सुद्धा विपरीत परिणाम झाला आहे. सध्या रात्रीच्या वेळेस या प्रदूषणामुळे देवळी शहर व परिसरामध्ये धुक्याचे स्वरूप येत असून लहान मुलांना श्वास घेतांना अडचणी निर्माण होत आहे.सोबतच स्थानिक सुशिक्षित बेरोजगारांचा प्रश्न गंभीर बनत चालला आहे. याच कंपनीचा पॉवर प्लांटचे काम जोरात सुरू आहे त्यामध्ये स्थानिक दोन हजार तरुणांना रोजगार देणार असल्याची घोषणा कंपनी प्रशासनाने पर्यावरणविषयक जनसुनावणी मध्ये केली होती मात्र प्रत्यक्षात मोठया प्रमाणात स्थानिक बेरोजगार तरुणांना डावलून परप्रांतीय तरुणांना रोजगार मिळत असल्याची स्थानिक बेरोजगार तरुणांची ओरड आहे. त्यामुळे हे दोन्ही विषय घेऊन आज युवा संघर्ष मोर्चाचे अध्यक्ष किरण ठाकरे यांच्या नेतृत्वात देवळी व परिसरातील तरुणांनी कंपनीवर धडक दिली व कंपनी व्यवस्थापनातील अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले. यावेळी कंपनी व्यवस्थानाच्या वतीने रमेश नाथ व कुबडे यांनी युवा संघर्ष मोर्चाचे शिष्टमंडळाशी चर्चा केली व निवेदन स्वीकारले. यासोबतच तहसीलदार जाधव यांना निवेदन देऊन प्रदूषणा विषयी सविस्तर माहिती दिली. व येत्या दहा दिवसात न्याय न मिळाल्यास कंपनी विरोधात मोठे जनआंदोलन उभारणार असल्याचा इशारा किरण ठाकरे यांनी दिला. यावेळी पोलीस उपनिरीक्षक सुमित कांबळे यांच्यासह पोलिसांचा मोठा बंदोबस्त होता. निवेदन देतेवेळी किरण ठाकरे यांच्यासह प्रविण कात्रे, लोमहर्ष बाळबुधे,स्वप्नील मदनकर,गौतम पोपटकर, मनोज नागपुरे, दादाराव मुन, कृष्णाजी भगत, गौरव खोपाळ, मनीष पेटकर, दिलीप बाळबुधे, निलेश तिडके, हारून तंवर,मंगेश वानखेडे, सुमित झोरे, सुरज भगत, राहील कुरेशी, अमोल भोयर, विनय महाजन, शारीक कुरेशी, योगेश आदमणे,अविनाश धुर्वे, सुरज रॉय, सुरज सावरकर, सागर पाटणकर यासह असंख्य तरुनव नागरिकांची उपस्थिती होती.
सागर झोरे साहसिक न्यूज-24