महासंस्कृती महोत्सवात करण्यात आली मतदार जनजागृती..

0

हिंगणघाट / पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग महाराष्ट्र शासन व जिल्हा प्रशासन वर्धा यांचे माध्यमातून टाका ग्राउंड हिंगणघाट येथे दोन दिवसीय महासंस्कृती महोत्सव पार पडला. महोत्सवाच्या शेवटच्या दिवशी दिनांक 24/02/2024 रोजी मतदार नोंदणी अधिकारी हिंगणघाट विधानसभा मतदार संघ व आगरकर विद्या मंदिर हिंगणघाट यांचे संयुक्त विद्यमाने फ्लॅश मॉब व गीत सादर करून मतदार जनजागृती करण्यात आली.आगामी लोकसभा निवडणूक 2024 च्या पार्श्वभूमीवर मतदार जागरूकता व सहभाग कार्यक्रम (SVEEP) द्वारे मतदारांचा निवडणूक प्रक्रियेत सहभाग वाढविण्यासाठी तसेच लोकसभा निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढविण्याकरिता विविध उपक्रम राबविले जात आहेत. त्याचाच भाग म्हणून दिनांक 24/02/2024 रोजी महासंस्कृती महोत्सवात आगरकर विद्या मंदिर या शाळेच्या विद्यार्थ्यांनी फ्लॅश मॉब सादर करून नवमतदारांना मतदार यादीमध्ये नाव नोंदविण्याचे व प्रत्यके निवडणुकीत मतदान करण्याचे आवाहन केले. तसेच समर्था सोरटे या चिमुकलीने भुलाबाईच्या गाण्याच्या माध्यमातून मतदार जनजागृती बाबतचे गीत सादर केले.सदर कार्यक्रम मतदार नोंदणी अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी हिंगणघाट शिल्पा सोनाले व सहायक मतदार नोंदणी अधिकारी तथा तहसीलदार श्री सतीश मासाळ व नायब तहसीलदार सागर कांबळे यांचे मार्गदर्शनामध्ये सादर करण्यात आला. हा कार्यक्रम सादर करण्याकरिता आगरकर विद्या मंदिर चे मुख्याद्यापक अशोक जोशी, पूनम जोशी, श्वेता वटे, संगीता पेठे गडवाल यांनी सहकार्य केले.

ईकबाल पहेलवान साहसिक न्यूज /24 हिंगणघाट

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!