मागील अनेक वर्षापासून देवळी बस स्थानकाचे काम अपूर्णच.
मागील तीन महिन्यांपासून बस स्थानकात नाही थांबत आहे बस,
नागरिक व विद्यार्थ्यांना सहन करावा लागत आहे अतोनात त्रास.
देवळी शहरातील बस स्थानकाचे बांधकाम मागील सहा वर्षापासून सुरु आहे.परंतु अजून पर्यंत काम पूर्ण झालेले नाही याबाबत देवळीतील अनेक नागरिकांनी तसेच सामाजिक संघटनांनी बस स्थानकाचे काम पूर्ण करण्यासाठी अनेक निवेदन दिले आणि शेवटी आंदोलनाची ही काम केले परंतु एसटी महामंडळ अधिकाऱ्यांचे केवळ पोकळ आश्वासन मिळाले आम्ही लवकरच काम चालू करू, ठेकेदार काम करत नाही,महिन्याभरातच काम पूर्ण करणार आहो,अशे अनेक आश्वासन देऊन वेळ काढून नेले.
मागील सहा वर्षांपासून देवळी तालुक्यातील नागरिक विद्यार्थी ऊन,वारा,पाऊसाचा सामना करीत जीवाची हाल अपेष्टा करून बस स्थानक समोर बसगाड्यांची वाट बघत उभे राहत असतात.परंतु या एसटी महामंडळाच्या निर्दयी प्रशासनाला वयोवृद्ध नागरिक व चिमुकले विद्यार्थ्यांनवर दया येत नाही का असा प्रश्न देवळीकर जनता करीत आहे.या दिवाळीच्या सणावर प्रवास करणाऱ्या लोकांची मोठ्या प्रमाणात संख्या वाढत असते परंतु यावेळी पुलगाव मार्गावर धावणाऱ्या बसेस बस स्थानकावर येत नाही त्यामुळे पुलगाव धामणगाव अमरावती याकडे जाणाऱ्या प्रवाशांना रात्री आणि दिवसांमध्ये बस स्थानकावरून पुलगाव नाक्यावर यावे लागतात तर पुलगाव नाक्यावरून देवळी बस स्थानकावर जावे लागत आहे.प्रवास करणाऱ्यांची गोची होत आहे.तसेच बस स्थानक बंद असल्यामुळे प्रवाशांसाठी प्रसाधनगृह व पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नसल्याने प्रवास करणाऱ्या नागरिकांना अतोनात त्रास सहन करावा लागत आहे.
मागील सहा वर्षांपासून बस स्थानकाचे रखडलेल्या बांधकामाची जिम्मेदारी कोण घेणार दोषी अधिकाऱ्यांवर तसेच बांधकाम ठेकेदारांवर प्रशासन कारवाई करणार का आणि प्रवाशांना होत असलेल्या अतोनात त्रासाला कोण जबाबदार आहे याची जबाबदारी प्रशासन घेणार का.
सागर झोरे साहसिक न्यूज-24