नुकसानीची केली पाहणी, सरकारने तत्काळ मदत करण्याची मागणी.
हिंगणघाट /रब्बीच्या हंगामात झालेल्या वादळी पाऊस विजेच्या गडासह पडलेल्या गारपीटामुळे गहु, हरभरा, ज्वारी इत्यादि पिकाच्या नुकसानीची माजी आमदार प्रा.राजू तिमांडे यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पाहणी केली व पिकांच्या नुकसानीचे सर्वेक्षण करून सरकार तर्फे आर्थिक मदत देण्याबाबत तसेच पिकविम्याचे सर्वेक्षण करून पिकविमा देण्याबाबत तसेच ज्या शेतकऱ्यांनी पिक विमा काढला नाही परंतु पिकांचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना सुद्धा सर्वे करून नुकसान भरपाई देण्याबाबत माजी आमदार प्रा.राजू तिमांडे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेउपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,उपमुख्यमंत्री अजित पवार,कृषिमंत्री दादा भुसे यांना उपविभागीय अधिकारी मार्फत निवेदनाद्वारे मागणी केली आहे.
रब्बीच्या हंगामात दि.१० फेब्रुवारी २०२४ पासुन झालेल्या विजेच्या गडगडासह वादळी पाऊस व गारपीटामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. हिंगणघाट तालुक्यातील आजनसरा,हिवरा, बोपापुर, पोहणा,पिपरी इत्यादि भागात गारपीटीमुळे उंबयावरअसलेल्या गहु खाली पडुन तुटला.फुलोर्यावर असलेल्या हरभऱ्याचे पुर्ण झाड निकामी झाले. तर घटयावर असलेला हरभरा फुटुन जमीनदोस्त झाला.
दि.११ फेब्रुवारीला मेघ गर्जनेसह गारपीट व पावसाने हिंगणघाट,समुद्रपुर तालुक्याचा संपुर्ण परिसर दणानला. जवळपास ३० ते ४५ मिनीटे पावसासह गारपिटीने झाडेवुन टाकले. निंबाच्या आकारची गार पडली. तर काही भागात निंबाच्या आकारा पेक्षा मोठया गारपिटीने पिकांना झोडवुन काढले.
हिंगणघाट शहराच्या परिसरात बुरकोनी, चिंचोली, चिकमोह, पारडी, लाडकी, वाघोली, वेळा, जामनी,दाभा, कान्हापुर इत्यादि परीसरात गारपीट झाल्यामुळे गहु, हरभरा, ज्वारी इत्यादि पिके निस्तनाभूत झाले असुन शेतकरी भिषण संकटात सापडला आहे.
समुद्रपुर तालुक्यातील कोरा, मंगरूळ, साखरा, ताडगांव, पिपरी, केसलावार, दसोडा, वानरचुवा, धामनगांव, तळोधी, सितली, गणेशपुर, दसोडा, गिरड, पिंपळगांव, पिपरी, अंतरगांव, वासी, निरगुडी, रामनगर, तांभारी, खंडाळा, भोसा, उमरा, कांढळी, मार्डी, कळमना, सालापुर, दिग्रस इत्यादि संपुर्ण परिसरात गारपीट व पाऊस झाल्यामुळे उभे पिके लोटुन पडली. अशाप्रकारे हिंगणघाट व समुद्रपुर तालुक्याचा परिसर गारपीट व पावसाने झोडपुन काढल्यामुळे गहु, चना, ज्वारी, भाजीपाला ईत्यादि पिके होरपळुन गेली तसेच संत्रा, मोसंबी, आंब्याचा बहार उन्मळुन पडला. शेतकऱ्यांच्या शेतातील गुराढोरांसाठी तयार केलेले कुटार पावसाने खराब झाले आहे.
अशाप्रकारे खरीप व रब्बीच्या हंगामात हातात आलेले पिक निस्तनाभूत झाल्यामुळे शेतकरी हावालदिल झाला आहे. तरी सरकार तर्फे पिकाचा सर्व्हे करून आर्थिक मदत देण्यात यावी अशी जनतेची मागणी आहे.
नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना पिकविमा कंपनीच्या ऑनलाईन संकेत स्थळावर व टोल फ्री क्रमांकावर ७२ तासाच्या आत तकार करायची आहे. मात्र यात तांत्रिक अडचण येत असुन जिल्हाधिकारी वर्धा यांनी तांत्रिक अडचन आल्यास शेतकऱ्यांनी तालुक्याचा पिकविमा कार्यालय किंवा प्रतिनिधींना वैयक्तिक अर्ज देण्याचे निर्देश देण्यात यावे अशी शेतकऱ्यांची मागणी आहे.
तरी सरकारने झालेल्या नुकसानाचे सर्व्हे करून पिक विम्याची रक्कम शेतकऱ्यांना देण्यात यावी मागणी माजी आमदार प्रा.राजू तिमांडे यांनी शासनाला केली आहे यावेळी हिंगणघाट कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती एड.सुधीर कोठारी,संजय तपासे विनोद वानखेडे,पंकज बचाटे,सचिन थुटे, प्रदीप डगवार,पिंटू बादले,सचिन तुळणकर दीपक पंधरे हरिभाऊ धवणे, देविदास साबळे,संजय तुराळे, शिरीष पंधरे,हरिभाऊ ढगे इत्यादी उपस्तीत होते.